एक सैतानी रात्र - भाग 19

  • 987
  • 1
  • 255

सीजन 2. भाग 8 एकूण कथा मालिकेचा भाग 19 कोण आहे रेंचो x शैडो 2!" बाबा ! " सुर्यांशच्या वाक्यावर दरवाज्यात उभे , बळवंतराव, त्यांच्या मागे उभे मानेसाहेब दोघेही चालत आत आले. बैडवर सनाही उठून बसली होती, तिच्याबाजुलाच अमृताबाई बसल्या होत्या, ज्या आता उभ्या राहिल्या. त्यांच्या उजव्या बाजुला सुजाताबाई आणि त्यांच्या जवळच सुर्यांश उभा होता. बैडपासुन पुढे एक दोन झापांच लाकडी चौकलेटी साडे पाच फुट उंच कपाट होत.कपाटा बाजुलाच आरश्याच टेबल होत-समोर बैठी लाकडी खुर्ची होती. दरवाज्याच्या बाजुलाच जिथे माने साहेब उभे होते,तिथे एक उभट तीन फुट टेबल होता-ज्यावर एक काचेची फुलदाणी होती. खोलीत भिंतींवर चारही दिशेंना एक एक गोल