एक सैतानी रात्र - भाग 20

  • 1.1k
  • 282

सिजन 2 भाग 9भाग 20 all स्टोरी # ****** xo :com विजय इनामदारने आपल्या उजव्या हातात काळ्या रंगाची मॉडर्न रिव्हॉलव्हर पकडली होती एका मोठ्या झाडाच्या खोडामागे तो लपला होता, आणि त्याच्या मागेच गोडमारे उभा होता. आजुबाजुला ही जंगलातली मोठ-मोठाली झाडे उभी होती, त्या झाडांच्या शेंड्यावरुन अर्ध्या चंद्राची पांढरी दुधाळ कोर चमकतांना दिसत होती. तीचा निळ्सर करडा प्रकाश झाडांच्य गर्दीतुन वाट काढत जमिनीवर पडायचा निष्फळ प्रयत्न करत होता. " सायेब! " गोडमारे हळुच पुटपुटला. " काय ?" पुढे शैडोकडे पाहतच विजयने विचारल. " तुम्हाला माझी शप्पत आहे, नेम चुकवु नका! नाहीतर ह्या जागेवरन आपल नेम चुकवील तो !" " लावली, लावली