कठोपनिषद - 2

  • 3.8k
  • 2.3k

कठोपनिषद २ यमराज म्हणाले, चांगली वस्तू (कल्याणकारक वस्तू) व आवडणाऱ्या वस्तू (सुखकारक वस्तू) या भिन्न असतात. हुशार माणूस चांगले ते निवडतो अज्ञानी माणूस सुखकारक वस्तू निवडतो. हे नचिकेता ! तूं योग्य ते निवडले आहेस. गुरुशिवाय हा विषय समजणार नाही. तुझ्या सारखा शिष्य मला नेहमी मिळावा. आत्मज्ञान देणारे कमी असतात पण योग्य गुरुकडून ज्ञान प्राप्त करणारे खूप कमी असतात. अनेकांना हे श्रवण करण्याची संधी मिळत नाही, काही दुर्देवी लोकांना ऐकून पण समजत नाही. पण सांगणारा कुशल शिक्षक व ऐकणारा बुद्धिमान व योग्य असे क्वचितच घडते. तू मोहाला बळी न पडता ज्ञान प्राप्त करण्यासाठी तयार झाला आहेस. भोगाची आसक्ती सोडून दिली पाहिजे.