स्वप्नद्वार - 8

  • 3.4k
  • 1.8k

स्वप्नद्वार ( भाग 8) भाग 7 वरून पुढे " काय? " सर्वांनी एका स्वरात प्रतिप्रश्न केला. " निशांत मला सांग तुला राजा वीरवर्धनबद्दल एवढी माहिती कशी आहे? " भुवया उंचावून डॉक्टर म्हणाले. "काही दिवसांपूर्वी माझ्या क्लिनिकमध्ये रमेश सहस्रबुद्धे हे ऐतिहासिक लेखक मानसिक उपचारासाठी आले होते. नुकतेच त्यांनी " गाथा वीरवर्धनची खंड -1" हे पुस्तक प्रकाशित केले होते. त्याचाच सोहळा आटोपून ते माझ्याकडे उपचारासाठी आले होते. मलाही अवांतर वाचनाची आवड असल्यामुळे मी त्यांच्याशी या विषयावर बरीचशी चर्चाही केली. ऐतिहासिक विषयावर समान विचार असल्यामुळे त्यांनी मला त्यांच पुस्तक ' गाथा विरवर्धनची खंड 1' हे पुस्तक मला वाचायला दिलं. ते विचित्र स्वप्ने पडण्याच्या