कालासगिरीची रहस्यकथा - 2

  • 6.8k
  • 4.9k

अध्याय ९: भयावह सत्य   सकाळ झाली आणि कालासगिरी गावात चैतन्य होतं. सरपंच महेश, श्याम, आणि डॉक्टरांची टीम गावात शिबिर उभारण्यासाठी व्यस्त होती. गावकरी शाळेत शिबिर उभारण्याच्या तयारीत होते, जे सरपंचांच्या वाड्याच्या समोर होतं. सरपंचांचा वाडा गावाच्या प्रवेशद्वाराजवळचा पहिला वाडा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लहानशा शेतं होती, ज्यामुळे गावाचं दृश्य सुंदर आणि शांत होतं.   गावकऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण केल्यावर चहा आणि नाश्ता झाला. मीरा, सुप्रिया, अपूर्वा, आणि अन्वी सरपंचाच्या पत्नी नीलिमा आणि त्यांची दहावीत शिकणारी मुलगी सायलीसोबत स्वयंपाकात मदत करत होत्या. स्वयंपाकघरात गजबजाट होता, पण मीराच्या मनात सतत त्या जुन्या, भयावह घराचे विचार होते. तिला सरपंच महेश काकांकडे जाऊन