सर्कसवाले नारायणराव वालावलकर

  • 3.2k
  • 1
  • 1.3k

सर्कसवाले नारायणराव वालावलकर ( स्त्री चित्रपटाच्या सेटवर व्ही.शांताराम यांच्यासोबत नारायणराव वालावलकर 1961 ) कै. नारायणराव वालावलकर यांच्या “ दि ग्रेट रॉयल सर्कस ” च्या कारकिर्दिवर आधारित “आम्ही सर्कसवाले ” ह्या पुस्तकाचे लेखन मी केले होते. 1988 ते 1996 ह्या सात आठ वर्षात मी तत्कालिन सर्कस मालक प्रतापराव उर्फ आप्पा वालावलकर , मॅनेजर अनंतकाका वालावलकर , मॄत्युगोलात बाईक रायडिंग करणारे मनोहरराव तथा मामा पेंडुरकर , अ‍ॅनिमल ट्रेनर अर्जुनराव वालावलकर , सर्कसच्या अकौंट्स सेक्शन मधिल अप्पा भोगवकर या मंडळीशी संपर्क ठेऊन होतो. मालक प्रतापराव उर्फ आप्पा वालावलकर यांच्या माझ्या घरी सात - आठ खेपा झाल्या असतील. मी सवड मिळाली की सर्कस जिथे