एस्टी प्रवासाची कथा

  • 2.5k
  • 1
  • 957

नांदेड- मुखेड अशी पाटी छातीवर लावून नांदेड आगारातून एसटी महामंडळाची गाडी नांदेड बसस्थानक फलाटावर उलट्या दिशेने लागली. मुखेडला जाणारी ती पहिलीच म्हणजे सकाळची आठ वाजताची गाडी होती. या बसला रोजच गर्दी असायची. आजही होती. गाडी खचाखच भरायला थोडाही वेळ लागला नाही. मिळेल त्या जागेतून प्रवाशी बस मधे घूसत होती. ड्रायव्हरच्या केबीनचे दार उघडून प्रवाशी आत शिरत होते. ड्रायव्हरचे केबीन सुध्दा गच्च भरले. ड्रायव्हरच्या सिट मागे कांहीं प्रवासी उभे राहिले. वाहक तोंडामध्ये 'गोवा' भरुन बस जवळ 'मुखेड...मुखेड...' असे ओरडू लागला होता. बसमध्ये आता पाऊल ठेवायला सुध्दा जागा नव्हती. तरीही त्याचे प्रवाशांना बोलावणं चालूच होतं. एका, दोघा प्रवाशांनी त्याला सूचना सुध्दा केली,