नात्यामधील ओलावा

  • 3.6k
  • 1.3k

सगळीकडे काळाकुट्ट अंधार, मध्येच गडगडाटी आवाजासह कोसळणाऱ्या वीजा, त्यात भर म्हणजे सपासप तोंडावर मारे करत बरसणारा पाऊस....एक जोरात किंकाळी मारावी तर ऐकायला तिथे कुणी असेल की नाही याची शाश्वती नव्हती. वातावरणातल्या गारव्यामुळे शरीर गोठल्यासारखे झाले होते. श्र्वासांची गती मंदावत होती. डोळे जड झाले होते अन् अशातच डोळ्यासमोर अंधारी आली. तेवढ्यात अचानक अतिशय कर्णकर्कश आवाज झाला आणि तो ताडकन उठून बसला. त्याने लगबगीने आजुबाजुला पाहिले. ते ठिकाण आणि ती जागा त्याला ओळखीची वाटली. कपाळावरचा घाम पुसत त्याने एक दीर्घ श्वास घेतला." संदेश, अरे काय झालं, बरा आहेस ना तू ; काही वाईट स्वप्न पाहिलस का तू आता झोपेत ? केवढ्याने दचकून