कामीनी ट्रॅव्हल - भाग १३

  • 2.1k
  • 1.2k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १३ठरल्याप्रमाणे राधा शशांक आणि शशांकनचे मित्र मंगेश भाई प्राचीच्या घरी ठरल्याप्रमाणे आले.शशांकने प्राचीला मंगेश भाई ची ओळख करून दिली." नमस्कार मंगेश भाई."" नमस्कार."" मंगेश भाई हे माझे मिस्टर हर्षवर्धन आणि या सासूबाई."मंगेश भाईंनी दोघांना नमस्कार करतात." मंगेश भाई शशांकने तुम्हाला सगळं सांगितलं असेल."" हो. त्याचं कामासाठी मी शशांक बरोबर आज आलोय."" शशांक म्हणाला ट्रॅव्हल एजन्सी सुरू करू शकतो."" हो. मीच तसं सुचवलं होतं शशांकला."" ट्रॅव्हल एजन्सीचं खूप मेहनतीचं काम आहे तर सद्य परिस्थितीत हर्षवर्धन कडून ही जबाबदारी पेलवल्या जाईल का हा प्रश्न मला पडलाय." प्राची म्हणाली." मॅडम मेहनत तर कोणत्याही क्षेत्रात आहेच. तुम्ही मेहनत किती घेता त्यावर