कामीनी ट्रॅव्हल - भाग १६

  • 1.9k
  • 1.2k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १६ कामीनी ट्रॅव्हल्स सुरू होउन आता काही वर्ष झाली.आता हर्षवर्धन कसा आहे? पुढे काय घडेल बघू या भागात. कामीनी ट्रॅव्हल्स सुरु होऊन आज आठ वर्ष झालीत. पहिली तीन वर्ष हर्षवर्धनच्या तब्येतीत सुधारणा करण्याकडेच प्राची आणि कामीनी बाईंंचं लक्ष होतं. त्यामुळे ट्रॅव्हलचा व्यवसाय मुंगीच्या पावलानी पुढे सरकत होता. प्राचीच्या बोलण्याने हर्षवर्धनमध्ये खूप फरक पडला. तीन वर्षांत हर्षवर्धनच्या जिद्दीमुळे तसेच प्राची आणि कामीनीबाईंच्या कष्टामुळे हर्षवर्धनमध्ये बरीच सुधारणा झाली. हर्षवर्धन अगदी पूर्वीसारखं व्हायला थोडी वाट बघावी लागणार होती. यासाठी प्राची आणि कामीनी बाईं तयार होत्या. *** कामीनी ट्रॅव्हल्सचा या टूर्स अँड ट्रॅव्हलच्या व्यवसायात ब-यापैकी जम बसला होता. हर्षवर्धनच्या अश्या केसमुळे