कामीनी ट्रॅव्हल - भाग १९

  • 2k
  • 1.2k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १९ मागील भागात आपण बघीतले की कामीनी बाईंना काही तरी सांगायचं होतं. काय सांगायचं होतं बघू या भागात. " आई काहीतरी सांगायचं होत तुम्हाला.सांगा." प्राचीने पुन्हा असं म्हणताच जरा घाबरत का होईना कामीनी बाईं बोलल्या. "आपल्या ऑफीस मध्ये अकाऊंट सांभाळणारे आहेत का कोणी?" "सध्या बाहेर देतोय आपण अकाऊंट तपासायला. शशांक ठेवतो सगळे अकाऊंट. पण त्याला त्याच्या ऑफीसचं कामपण असतं. बाहेर सगळं व्यवस्थित आहे नं हे बघायला देतो. म्हणूनच मी विचार करतेय अकाऊंटट हवा अशी जाहीरात द्यावी." "मला वाटतं जाहीरात देऊन नवीन कोणी माणूस घेतला तरी त्यांच्यावर कोणीतरी आपला माणूस हवा. मी म्हणत होते. तुझे बाबा रिटायर्ड झालेत