कामीनी ट्रॅव्हल - भाग २०

  • 2.1k
  • 1.2k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २० मागील भागात आपण बघीतले की हर्षवर्धन आणि प्राचीचं एक हळूवार नातं तयार होऊ लागलं. आता बघू या भागात काय होईल. सकाळी प्राची उठली तेव्हा तिला खूपच ताजतवानं वाटतं होतं. तिचं हर्षवर्धनकडे लक्ष गेलं.एखाद्या निरागस मुलाप्रमाणे तो झोपला होता. प्राची आपलं आवरून खोलीबाहेर आली. कामीनी बाई स्वयंपाकघरात चहा करत होत्या.प्राचीकडे लक्ष जाताच म्हणाल्या " अरे व्वा! आज गडी खूष दिसतोय.काॅफी करु का तुझी?" त्यांच्या प्रश्नावर प्राचीनी त्यांना घट्ट मिठी मारली. कामीनी बाईंच्या लक्षात आलं आजचा आनंद काही वेगळाच आहे. हिची मिठी थरथरतेय. ही थरथर एक संवेदनशील गोष्ट आनंदाने आपल्यापर्यंत काहीतरी पोचवते आहे. बराच वेळ हळव्या, संवेदनशील प्रेमात