कामीनी ट्रॅव्हल - भाग २८

  • 1.4k
  • 753

कामीनी ट्रॅव्हलक्ष भाग २८ पाटकर विद्यूतची माहिती देतो. त्याला प्राची केबीनमध्ये बोलावून चांगलीच झापते. विद्युत प्रथम आपला गुन्हा कबूल करत नाही.पाटकर समोरून त्याला सगळे फोटो दाखवतात.ते बघीतल्यावर त्याची बोलती बंद होते. "विद्युत... फोटोवरून आणि पाटकरांनी जी माहिती दिली त्यावरून आम्हाला कळलय तू कोणासाठी काम करतोस.पण तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. पटकन बोललास तर ठीक नाहीतर मला पोलीसांनी मदत घ्यावी लागेल.तुला काय आवडेल?" प्राचीचा कडक स्वर ऐकून विद्युत मनातून घाबरला. " मॅम मी तोंडलकर गृपसाठी काम करतो. मी तिथेच काम करतो पण जास्तीच्या पैशासाठी मी हे काम करायला तयार झालो. मॅम मला माफ करा.मला काढू नका." " तुझं इथे काम काय आहे.