कामीनी ट्रॅव्हल - भाग ३२

  • 1.5k
  • 795

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३२ प्राची आज दिवसभर कामात होती.कारण यावेळी एकाच वेळी चार ठिकाणी कामीनी ट्रॅव्हल्सचे टूर निघणार होते. पहिल्यांदाच असे टूर काढणार असल्यामुळे त्यांचं योग्य नियोजन करणं आवश्यक होतं. कामीनी ट्रॅव्हल्सच्या जाहीरातीत ज्या व्यक्ती आपले अनुभव सांगत त्या व्यक्ती कामीनी ट्रॅव्हल्स बरोबर प्रवास केलेल्या किंवा अजूनही करणा-या होत्या. त्यामुळे सामान्य व्यक्तींचा त्या जाहीराती बघून कामीनी ट्रॅव्हल्सवर विश्वास बसत असे. या जाहीरातीत कोणाही सेलिब्रिटीना प्राचीनी घेतलं नव्हतं. तिच्या दृष्टीनी तिचे प्रवासी हेच तिच्यासाठी सेलिब्रिटी होते. ही तिची युक्ती जाहीरात प्रदर्शित झाल्यानंतर खूप उपयुक्त ठरल्याचं लक्षात आलं. या जाहीराती मुळे कामीनी ट्रॅव्हल्सकडे येणा-या प्रवाश्यांची संख्या वाढली होती. म्हणूनच यावेळी एका वेळी