कामीनी ट्रॅव्हल - भाग ३८

  • 1.2k
  • 585

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३८ प्राची आता जरा सावरलेली दिसत होती.पण अजून तिच्या मनात गोंधळ होताच. ऑफीसमध्ये जायची तिला इच्छा होत नव्हती. आज कामीनी बाईंनी तिला घरीच रहा म्हटलं. हर्षवर्धनला कळत नव्हतं किती दिवस प्राची घरात राहणार आहे? ऑफीसमध्ये एकट्याने जाऊन सगळं मॅनेज करणं त्याला कठीण जात होतं. म्हणून तो कामीनी बाईंना म्हणाला. "आई प्राची किती दिवस घरी थांबणार आहे? ऑफीसमध्ये सगळं तिच्या निर्णयावर अवलंबून असतं." हर्षवर्धनचा चेहरा बघून कामीनी बाईंना त्याचा राग आला. " हर्षवर्धन अरे प्राची ची अवस्था काय झाली आहे बघतोस नं तू. तू घे पुढाकार.ऑफीसमध्ये जे निर्णय घ्यायचे तू घे." " मी…? " " मग काय झालं?