अपराधबोध - 12

  • 2.9k
  • 1
  • 1.5k

श्वेताने मात्र त्याचा डोळ्यांत बघीतले तर तीला कही गंभीर बाब असल्याची जाणीव झाली. शिवाय तीने बघीतले की सारांशचे डोळे लाल झालेले होते, मग तीने त्याला वीचारले, " सारांश काही गंभीर गोष्ट आहे काय,अरे तू रात्रभर नीट झोपला सुद्धा नाहीस असे वाटत आहे. काय झाले मला सांगशील काय " मग सारांश थोडा असहज होऊन बोलला, " काय आणि कुणाला सांगायचे, ज्याला काही सांगायचे म्हटले तर तो ऐकून घेत नाही आणि ज्याचाशी काही बोलायचे नाही तो गळ्यात पडायला बघतो ." मग श्वेता सुद्धा अधिक गंभीर होऊन त्याला वीचारू लागली तेवढयात बस आली आणि ते दोघेही बस मध्ये बसून त्यांचा ऑफिसला नीघून गेले.