निकिता राजे चिटणीस - भाग १८

  • 1.9k
  • 1k

  निकिता राजे चिटणीस भाग  १८ भाग १७   वरून  पुढे  वाचा .........   निकिता नितीन एकदम हवालदिल झाला होता. समजत नव्हत त्याला कसं ताळ्यावर आणायच ते. बाबांच्या जाण्याचा खूप मोठा धक्का त्याला बसला होता. १५ दिवस होऊन गेलेत आता पर्यन्त सावरायला हवा होता. परवा इंस्पेक्टर पाटील आले होते तेंव्हाही हा गप्पच बसला होता. काही तरी करायला हव. पाटलांना माझ्यावर संशय आहे हे मात्र जाणवलं. आई तिथेच होत्या त्यांच्याशी यावर बोलायला हवं. दुपारी जेवणानंतर नितीन बद्दल पण बोलायला हव. काही तरी line of action  ठरवायला हवी. अस सोडून चालणार नव्हत. “आई तुम्हाला काय वाटत काय करायला पाहिजे ?” “कशा साठी ?