पश्चाताप - भाग 2

  • 1.6k
  • 798

पश्चाताप भाग दोन शिक्षक विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून विचार करीत होते. त्यातच सरकारही विद्यार्थी दृष्टीकोनातून विचार करीत होतं. परंतु ते शिक्षण निःशुल्क करीत नव्हतं. मात्र ते कधीकधी वक्तव्य करीत होतं की शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवीत नाहीत. ज्यात त्यांना संशयता होती. ती संशयता दूर करण्यासाठी सरकार शिक्षकांची चाचपणी करणार होते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करणे, पाठ्यपुस्तकातील कोण्या पानाचा प्रभावी वापर करणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती, आनंददायी शनिवार, एक राज्य एक गणवेश उपक्रम. हे सर्व उपक्रम शाळा राबवते का? यावर शिक्षण विभागाने सुरु केलेली प्रत्यक्ष चाचपणी. याची बातमी त्या शहरातील एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात एक छापून आली होती. त्यात लिहिलं होतं की आता शाळेची परीक्षा होणार. आम्ही