नियती - भाग 12

  • 4.2k
  • 3.3k

भाग 12बाबाराव...."मायू.... तू आणि कार्यकर्ते आहेतंच ग. पण आपल्या घरचा एखादा धडधाकट मुलगा पण हवा. आणि सध्या तरी आपल्या जवळचा तोच आहे म्हणून.. आता जास्त काही विचार करू नको... पाहू पुढे आपण..."मायरा....."ठीक आहे... बाबा....पण आई कूठे..."असे बोलतंच होती तर उजवीकडून आवाज आला काहीतरी खाली पडण्याचा....बाबाराव आणि मायरा दोघांचेही लक्ष तिकडे गेले. तर घरात काम करणारा एक गडी माणूस चहाचा कपाचा ट्रे घेऊन येत होता. त्याच्या हातातून चहाचा ट्रे खाली पडला.आधीच बाबाराव मनातली अस्वस्थता मनातच दडपून शांतपणे हँडल करत होते सगळं... आत मधून ... आंतरिक.. तडफड होत होती त्यांची कधीपासूनची... आणि आता हा चहाचा ट्रे खाली पडला तर मात्र शांतपणाचं सोंग