नियती - भाग 12 Vaishali Sanjay Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 12





भाग 12


बाबाराव....

"मायू.... तू आणि कार्यकर्ते आहेतंच ग. पण आपल्या घरचा एखादा धडधाकट मुलगा पण हवा. आणि सध्या तरी आपल्या जवळचा तोच आहे म्हणून.. आता जास्त काही विचार करू नको... पाहू पुढे आपण..."




मायरा.....

"ठीक आहे... बाबा....पण आई कूठे..."

असे बोलतंच होती तर उजवीकडून आवाज आला काहीतरी खाली पडण्याचा....




बाबाराव आणि मायरा दोघांचेही लक्ष तिकडे गेले. तर घरात काम करणारा एक गडी माणूस चहाचा कपाचा ट्रे घेऊन येत होता. त्याच्या हातातून चहाचा ट्रे खाली पडला.





आधीच बाबाराव मनातली अस्वस्थता मनातच दडपून शांतपणे हँडल करत होते सगळं... आत मधून ... आंतरिक.. तडफड होत होती त्यांची कधीपासूनची... आणि आता हा चहाचा ट्रे खाली पडला तर मात्र शांतपणाचं सोंग घेऊन असलेले बाबाराव....




शांतपणा टिकवू शकले नाही.... भरभर त्या काम करणाऱ्या गडी माणसाकडे गेले... आणि अगोदर त्याच्या मुस्काटात दोन ठेवून दिले. डोळे अंगार बरसू लागले पुन्हा.

आणि न राहून आणखीन दोन मुस्काटात ठेवल्या.. अचानक असा अंगावर हल्ला झाल्यामुळे तो गडी माणूस धडकन खाली पडला. तर बाबाराव गुरकावत त्याला लाथेलाथेने मारू लागले.




नुकताच आलेला राम सुद्धा त्यांचे हे रूप बघून मनातून घाबरून गेला.




मायरा ही अंतर्मनातून घाबरून पाहू लागली.... निव्वळ चहाचा कप सांडला म्हणून आपले बाबा त्याला एवढे मारतात हे तिला काही पटले नाही. तिला ते थोडसं विचित्र वाटले.




आपण आपले बाबा एवढे दिवस झाले शांत बघत आहोत. आतापर्यंत आपण त्यांना तसेच पाहत आलेलो आहोत. आणि आज हे काय बघतोय आपण...???




निव्वळ चहाच्या ट्रे साठी.... विश्वास करावा की अविश्वास...???... आपलेच बाबा आहेत ना हे... आणि हा राम सुद्धा असा काय बघतोय शांतपणे....



मला जसं पाहून घाबरल्यासारखे वाटत आहे तसं रामच्या चेहऱ्यावर का दिसत नाही आहे घाबरल्यासारखे भाव...!!




ती अस्वस्थपणे एक नजर बाबाकडे आणि एक नजर राम कडे वळवून बघत होती... राम स्थितप्रज्ञाप्रमाणे मारणाऱ्या बाबांना बघत होता. त्याला त्या गडी माणसाच्या जीवाची काहीही तमा नव्हती.




न राहून मग मायराच पुढे गेली आणि बाबांना पकडलं.




मायरा....

"अहो बाबा... काय करता...??? सोडा त्याला....

मरेल तो... अहो ...सोडा ना..!!"




बाबाराव....

"काय सोडायचं...?? या लोकांची अशीच जिरवायची असते...??? पायातील वाहाणांनी पायातंच राहावे.डोक्यावर बसवायचं का यांना... मिऱ्या वाटतील मग... एकही काम धड करत नाही.... फुकटचा पगार द्यायचा का यांना...???"



बाबाराव डोळ्यातून अंगार पाखडत पायाशी पडलेल्या गडी माणसाकडे पाहून बोलत होते. 



केव्हापासून धूसफुस होती ती आता मोकळी होत होती गडी माणसाच्या माध्यमातून.... बिचाऱ्याला मारून मारून खिळखिळं करून टाकलं त्यांनी.

मायराने बाबारावांचा हात धरून बाजूला घेतले. आणि राम कडे पाहून नजरेने इशारा केला गडी माणसाला घेऊन जाण्याचा.....



इशारा समजून गडी माणसाचा हात धरून रामने उठवले आणि त्याला घेऊन गेला.



बाबारावांच्या आवाजाचा गोंधळ ऐकून शेरा तेथे आला. तर मग बाबाराव तेथे बसलेले दिसले तर लगेच हा धावत जाऊन त्यांच्या बाजूला बसला सोफ्यावरच...



शेराचे सोफ्यावर बसणे मायराला आवडत नव्हते. पण तो सोफ्यावर बसल्याबरोबर बाबाराव यांचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि चेहऱ्यावर मंद स्मित झळकले लगेच कुरवाळू लागले त्याला. बाबारावांचा राग शांत होऊ लागला शेरा मुळे तर मायराने मग त्याच्याकडे दुर्लक्ष केले...



शेराच्या पाठीवर हात फिरवत बाबाराव लांब लांब श्वास घेत होते. आताच्या प्रकारामुळे त्यांचा श्वास फुलला होता. दोन एक मिनिटं गेल्यानंतर मात्र श्वास नॉर्मल होऊ लागला.



त्यांच्यात होणारे हे बदल मायरा टिपत होती लक्षपूर्वक.



तिला आता पूर्णपणे खात्री झाली होती की बाबारावांच्या मनात काहीतरी नक्की चालू आहे.



पण काय ...?? काय चालू असावे...??



ती सोफ्यावर त्यांच्या बाजूला बसून सहजता दाखवून स्वतःच्या वडिलांना तपासत होती.



थोड्यावेळापूर्वी मोहित म्हणाला होता की पाठलाग करणारा इसम राम होता... आणि राम येथे येऊन आहे. निदान तो वीस मिनिटे तरी पूर्वी आलेला आहे.




पण पाठलाग करणारा खरंच राम असेल काय...??




सगळीकडे अंधार होता... दिवेलागणची वेळ पलटली होती. रस्ता झाडाझुडपांचा होता.. खरंच अंधाऱ्या सावल्यांमधूनही मोहितने स्पष्ट पाहिले असेल का याला..?? नाही ...नाही... खरंच रामच असेल.... मोहित खात्री झाल्याशिवाय कधीच सांगत नाही. त्याने सांगितलं आहे खात्रीने म्हणजे खरंच राम पाठलाग करत होत.



हो...हो.. बरोबर आहे.. रामच आहे तो...!!!

शीट zzz शीट zzz शीट zzz म्हणजे बाबांना सगळं कळलेलं आहे....





मग माझ्यावर रिऍक्ट का नाही झाले हे...???

आमने सामने बोलायला पाहिजे ना....!!!!




आज पर्यंत तर आमच्या दोघांमध्ये कोणताही पडदा नव्हता... मग आता असं लपवाछपवीचा खेळ आपल्या मुली सोबत का करत आहेत...???



म्हणजे मोहित म्हणतोय ते बरोबर आहे....



आज सकाळी बाबांनी मोहितला घरी प्रेमाने बसवले... जवळ घेऊन बोलले ते...ते सर्व नाटकी होतं....




हे सर्व निवडणुकीत उभे राहायचं आहे यासाठी करत आहेत काय बाबा.... तोंड देखले गोड बोलणे आणि पाठीमागून सुरा घोपने... स्वतःच्या मुली सोबत एवढं मोठा प्लॅन.....



बरं झालं मी मोहित जवळ जबरदस्ती फोन देऊन आले. देऊन कुठे जवळ जवळ कोंबूनच आले.... एवढं साधं असून चालत नाही... मी पण आता पाहणारंच आहे. बाबाराव कोणता खेळ खेळणार आहेत....????




रात्री जेवणे झाली....सर्व आपापल्या रूममध्ये झोपायला गेले.... मायरा सध्या तरी घाबरी घुबरी झाली होती. अनामिक भीतीने तिचे हृदय धडधडत होते...




तिला काही सुचत नव्हते... बेडवर बसून अस्वस्थपणे निव्वळ टक टक पाहत होती इकडे तिकडे...




भिरभिर नजर फिरत होती तर भिंतीवरच्या तिच्या आजीच्या फोटोकडे लक्ष गेले..... आजी जाऊन आता दोन वर्ष होत आले होते..... तिची आजी तिची एक मैत्रीण होती जवळची गावातली खास.... तिच्या अडचणी तिचे दुःख तिचा आनंद सर्व सर्व शेअर करत होती ती आजी सोबत.......



एकटक आजीच्या फोटोकडे पाहताना डोळ्यांमध्ये अश्रू

तरळले.




"बघ ....आजी ....आज तू नाही आहेस तर तुझा मुलगा माझ्यासोबत काय करतोय....??? माझ्या जीवाच्या जीवावर उठलाय तो....!!!. तू असतीस तर मला धीर असता आता..."

असे म्हणून आपले दोन्ही तळहात चेहऱ्यावर झाकून हमसून हमसून रडू लागली......



आणि मग तिला तिच्या डोक्यावरून प्रेमाने कोणीतरी हात फिरवत आहे असे भासू लागले. तो स्पर्श तिच्या ओळखीचा होता... जवळच्या परिचयाचा होता...

"पोरी.... असं कसं चालेल खचून..... आत्ता तर ही सुरुवात आहे.... तू हिम्मतवान आहेस...."




मायरा...

"आजी... तू आलीस... बघ ना तुझा मुलगा..."

असे म्हणत आपल्या आजीला बिलगून रडू लागली.




आजी....

"धीरानं घे पोरी... सगळं काही ठीक होईल... शांतपणे विचार कर... पाऊलं उचल व्यवस्थित.... स्वतः सोबत स्वतःच्या प्रेमालाही वाचव..."

बोलता बोलता आजी तिचे अश्रू पुसत होत्या...





मायरा.....

"पण मी काय करू...?? मला तर उद्या हे मामाच्या गावाला पाठवत आहे आई सोबत... मला हेही माहित आहे की हा सुद्धा त्यांचा काहीतरी प्लॅन आहे. मी गेल्यावर मामाकडे हे नक्कीच मोहित सोबत काहीतरी करतील."





आजी....

"पोरी ...पोरी... एवढ्याशा संकटाने आत्ताच तू घाबरली आहे... असे हात पाय गाळून चालणार नाही... माझी शिकवण लक्षात ठेव..... कितीही कठीण परिस्थिती आली तरी हात पाय न गाळता धीरानं तोंड द्यायचं... घारीची नजर ....चित्याची चाल.... बुद्धिबळात हूशारी वापरतेस ती हूशारी... नेहमीच ठेवायची... काळा बरोबर सर्व बरोबर होत जाईल..."




आजी बोलत बोलत तिच्या पाठीवरून डोक्यावरून प्रेमाने कुरवाळंत होत्या...




तिने हो म्हणून वर खाली मान हलवली आजीच्या कुशीतच.




तशीच ती खाली सरकली आणि आजीच्या मांडीवर डोके ठेवून लेटली... तिला शांत शांत वाटू लागले. आजी तिच्या केसांमध्ये बोटे फिरवत फिरवत माथा ही चेपून देत होत्या. मायराचे डोळे जड झाले हळूहळू आणि मग झोपून गेली तशीच....




पहाटे चार चा प्रहर असेल... दूरवरून तिला शेरूचा भुंकण्याचा आवाज आला.... शेरू एवढ्या पहाटे असा का भुंकतोय...??? म्हणून ती डोळे किलकिले करत उठून समोर जाऊन खिडकीच्या गजांमधून बाहेर पाहू लागली.




तर अंधुक अंधुक असणाऱ्या प्रकाशामधून सडपातळ अशी आकृती गेटच्या आत येताना दिसली.... ती आकृती गेटच्या आत मध्ये बिनविरोध आली ... ना त्याला वॉचमनने अडवले... ना शेरुनी हाकलले... म्हणजे तो बंगल्यात नेहमी येणारा व्यक्ती असावा...




मग कोण असावा हा... असा विचार करत ती डोळे बारीक करून बघू लागली.



🌹🌹🌹🌹🌹