नियती - भाग 8 Vaishali Sanjay Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 8





भाग -8





आणि आता दुसरी चिंता होती की दिवसेंदिवस आता मोहितला समजत जाणार होते ,अक्कल येणार होती,

तर लोकांकडून खरे समजण्याची भीती होती दोघांना.



एक दिवस कवडू असाच बसलेला होता. त्याच्या मनात तीच तगमग सारखी होती आणि दिवस जात होते तशी तशी नवीन चिंता  ग्रासंत होत्या..
आपल्या मनात असलेली चिंता ती...



कवडू पार्वतीला बोलू लागला...की.....

"पार्वती ...आता मोहितला आपल्याला शाळेत घालावे लागेल."




"हो."

. कवडू बोलायला मोहितला शाळेत घालावे लागेल पण त्यालाही माहीत होते की त्याच्याने हे होणार नाही शाळेत मोहितला प्रवेश घेऊन देणे.
कारण गावामध्ये  त्या लोकांना शाळेमध्ये प्रवेश नव्हता. आणि त्याची परिस्थिती मोहितला बाहेर पाठवण्याची नव्हती.







इकडे पार्वती म्हणाली....
"केव्हा घालणार..??"






"तेच विचार करताय मी. त्याला इथे तर आपण घालू शकत नाही पण शयरामध्ये तुझा जो भाऊ आहे त्याच्याकडे आपण याला ठेवून शाळेत घालू शकतो शहरात."




"इतक्या दूर त्याला पाठवायचे.."
असे म्हणत तिने घाबरून इकडे तिकडे पाहिले तर मोहित स्मशानात एका बाजूने मातीमध्ये खेळताना दिसला.




कवडू म्हणाला.....
"पारू ..पोरगं कसं  चिकणं आहे दिसायला आता . 
हुशार आहे पोर रक्ताने. त्याला शिकवलं पाहिजे. खूप खूप शिकायला पाहिजे मोहित. तुझ्या दादू कडे ठेवूया त्याला.
पैसे पाठवत जाऊ आपण."




पार्वती....
"अहो... त्यापेक्षा मी इथल्याच मास्तरला सांगते ना...!!! पोराला दूर बसून शिकवत जावा."




कवडू...
"पाय पारू... तू सांगितल्यावर मास्तर शिकवल ही. आणि मोहित शिकलही. पण सांगतो ...आपल्याला पोरग देवाने दिला आहे. नशिबाने हातात आला आहे... हे जे नशिबाने आपल्याजवळ आहे ना ते चाललं जाईल. जसा जसा मोहित मोठा होत जाईल तसं तसं गावातल्या लोकांकडून त्याले काहीबी कळन. आपल्याला माहित आहे ना... गावातले लोक कसे बोलतात. एकाचे दोन पायलीचे तीन लावणारे लोक जास्त आहे. त्याच्यात त्याला मी बाप नाही आणि तू आई नाही हे समजेल.. आणि वाढीच्या वयामध्ये काही काही लोकांच्या गोष्टी ऐकून कमी वयामध्ये बिघडून जाईल नाही का...???"




सगळं ऐकून पार्वती तिच्या डोळ्यात गरगर पाणी आले.
आपल्या नजरेसमोरून पोराला दूर करण्यासाठी तिचे मन अजिबात तयार नव्हते. शिक्षणासाठी बाहेर ठेवणे म्हणजे काही एका दिवसाचे दोन दिवसाची गोष्ट नव्हती.



पूर्ण शिक्षण होत पर्यंत बाहेर म्हटले नाही म्हटलं तरी आठ नऊ वर्ष राहणार होता.




आता या गोष्टीवर रोज कवडू आणि पर्वतीचा वादविवाद होत होता. कवडू मोहितला बाहेर पाठवू असा विचार करत होता तर पार्वतीला मोहितला बाहेर पाठवायचे नव्हते. जवळ ठेवायचे होते .

लेकराला आपल्या लाडात ठेवायचे होते.
पार्वती त्याला शहरात पाठवायला अजिबात तयार नव्हती. तिचा हट्ट पाहून आता कवडू सुद्धा चिंताग्रस्त झाला होता.





पण या दोघांमध्ये असणारा पेच... वादविवाद पार्वतीच्या दादूने सोडवला.



एक दिवस तोच गावात पार्वतीकडे आला होता.
तेही बायको आणि पोरीला आपल्या सोबत घेऊन राहण्यासाठी.



जणू त्याला स्वप्न पडले होते यांच्या वादविवादाची.
पार्वतीचा दादू आला तेव्हा त्याच्यासोबत बायको आणि तिन वर्षाची मुलगी होती.


ती मुलगी पार्वतीच्या दादूला लग्नाच्या अकरा वर्षानंतर झाली होती.


नवस फेडायला दादू आणि त्याची बायको पोरीसह पार्वतीच्या घरी यायचे. 








जिथे रोज पार्वती नवसाला जायची शिवपार्वतीच्या मंदिरात तेथेच तिच्या दादूनंही महादेवाला नवस सांगितला होता.
तर त्यांच्या नवसानेच मूल झाले अशी त्यांची धारणा होती.





दादू......
"कामाच्या व्यापापायी या पाच एक वर्षांमध्ये नवस फेडायला मंदिरात येणे झाले नाही आमचे.
पण कवडू...
तुला मुलगा झाला आणि तो एवढा झाला .
अजिबात कळवलं नाहीस."






पार्वतीचा दादू एकटक मोहित कडे पाहून बोलत होता. त्याच्या मनाला हे बिलकुल पटत नव्हतं की कवडू आणि पार्वतीचा मुलगा एवढा सुंदर असणार.
दादू पुन्हा कवडूला म्हणाला....
"अरे !! निदान चिठ्ठी तरी पाठवायची होती..."




दादू कौतुकाने निव्वळ गोऱ्यापान गुबगुबीत मोहितला पाहत होता. आणि अधून मधून तो आपल्या मुलीलाही पाहत होता.
आणि चान्स मिळत असताना आपल्या बायकोला काहीतरी सांगण्याचा इशारा करण्यासाठी डोळे मिचकावतो .




काहीतरी सुचवायच्या उद्देशाने बारीक नजर करत बायकोकडे वळत बोलू लागला.


दादू.....
"कवडू माझी पोरगी कशी आहे."




कवडू...
"चांगली आहे."




दादू....
"सुनबाई करून घे मग तिला."




कवडू...
"तुझ्या बहिणीला विचार."




दादू....
"तिला काय विचारू..!!  ती का नको म्हणणार आहे...
बघ आताच विचार करून सांग."




कवडू...
"दादू ...तुला मोहित जावई म्हणून हवा आहे...??"





दादू ....."हो"


कवडू.....
"हा... एका अटीवर... तुला मोहितला खूप खूप शिकवावं लागेल .. तुझ्याकडे शहरात नेऊन."




दादू....
"अरे... आपल्या पोरांना कशाला शिकवायचं.. शिकवायचं असेल तर निव्वळ कातडी कमवायला शिकवायचं चांगलं."





इकडे कवडू जेवढा होईल तेवढं मोहितचे खरी माहिती सांगण्याचे टाळत होता. तो विचार करत असतो ...


त्याला मोहित बद्दल खरं सांगू की न सांगू.






पण शेवटी त्याने सांगायचे ठरवले दादूला ..पर्यायही नव्हता ....नाही तरी त्याला कळलेच असते.




कवडू...
"दादू हे माझे पोर नाही .एका पोर आहे........,..........."




कवडू जसा जसा सांगत होता तस तसे दादूला एखादा सिनेमा पाहत आहोत की काय ?? असे वाटत होते.
पण त्यालाही समजत होते की हे खरंच असावे.
कारण कवडू आणि पार्वती दोघेही अस्सल काळ्या कातडीचे आणि मोहित गोरा गोमटा चकचकीत एकदम.





मग दादूनी विचारले कवडूला...
"कवडू.... तुला खरंच तुझ्या पोराला माझ्या घरी मुंबईला शिकवायला ठेवायचे आहे का??? आणि मग शिक्षण झाल्यावर.... तू माझ्या पोरीला सून बनवून घेणार ना!! नक्की."




कवडू त्यावर बोलला...
"हो... तू माझ्या पोराचे शिक्षण त्याची जोवरी इच्छा आहे तोपर्यंत त्याला शिकू दे. त्याचं पूर्ण शिकून झाल्यानंतर मी त्याला तुझी पोरगी मागायला लावीन. हा कवडूचा शब्द आहे"





या दोघांचे बोलणे शेवटचे ...पार्वतीने ऐकले
आणि पार्वती कवडू आणि दादू या दोघांसोबत कचाकचा भांडली. 




कवडूने शेवटी माघार घेतली पण दादूने माघार घेतली नाही. कवडू पेक्षा दादू हा बेरकी माणूस .... 



भावाबहिणीची चांगली खडाजंगी झाली तरीसुद्धा 
दादू पार्वतीला पटवून देण्यात सक्षम ठरला.





कारण त्याचाही डोळा होता पार्वतीच्या पोरावर मोहितवर.
त्याला मोहित खूप खूप आवडला होता.



मुलगा कोणाचा का असेना पण दिसायला अगदी गोरागोमटा गुटगुटीत मोहित त्याला भावून गेला होता. 




शिवाय कवडूची शेती वर्षभर बसून खाता येईल एवढी पिक देणारी हाही एक दुसरा हेतू होता.


आता तर दादू कवडूकडे चांगला महिनाभर राहिला. त्यामुळे त्याची आणि मोहितची चांगली ओळख झाली. 



पण जेव्हा महिन्यानंतर गावाला निघाला तेव्हा मोहित त्याच्यासोबत जायला तयार नव्हता .


खूप रडत होता. 
तसा कवडू आणि पार्वतीचा जीव गलबलला होता.




मोहितच्या रडण्यामुळे शेवटी हे ठरले की आता सध्या मोहित सोबत पार्वती सुद्धा जाईन दादू कडे थोडे दिवस राहील. 




मोहित चांगल रूळून रस्त्यावर आल्यावर पार्वती परत येणार असे ठरले.




कवडू तर काही जाऊ शकत नाही कारण त्याचे एकंच ....
ती म्हणजे वतनदारी.
त्यामुळे त्याला कुठेच जाणे जमत नव्हते.




पार्वती तेथे  जातेय म्हटल्यावर दादूला सुद्धा बरे वाटले कारण मोहित एवढा रडत होता की त्यालाही विचार पडला होता की नेल्यावर तो तिथे राहील की नाही...???


कवडू सर्वांना बस स्टॉप पर्यंत सोडायला गेला. बस स्टॉप वर आल्यावर सर्वजण एका ठिकाणी बसलेले होते आणि बस येण्याची वाट बघत होते. 



तेव्हा दादूने कवडूला बाजूला नेले आणि सांगितले.....




"दादू... मोहितला केव्हाच हे माहीत नको होऊ देऊ की मी त्याचा बाप नाही. जर का त्याला माहित झाले. तो माझा मुलगा नाही तर कूणा दुसऱ्याचा मुलगा आहे. तो मग तुझ्या मुलीशी लग्न करणार नाही. जर तुझ्या मुलीशीच त्याने लग्न करावे असे वाटत असेल तर त्याला केव्हाच हे माहीत होऊ देऊ नको की मी त्याचा बाप नव्हे."





दादू....
"तू निश्चिंत रहा याबद्दल .
त्याला अजिबात म्हणजे अजिबात नाही माहित होणार नाही की तो तुझा मुलगा नाही. आणि मी त्याला सांगेनच कसा ??मला त्याला जावई करून घ्यायचा आहे."




कवडू....
"हे बघ दादू.... गावात कुणाला कळू नये की तो शहरामध्ये शिक्षणासाठी गेलेला आहे. आणि आता तुझा होणारा जावई तुझ्याजवळ राहणार आहे तर त्यांची चांगली काळजी घेशील."

(भूतकाळ समाप्त)

................



सर्व सांगून पार्वती बाई चूप राहिल्या आणि मोहित काय उत्तर देणार?? त्याच्याकडे बघू लागल्या.


आणि तेवढ्यात मग कवडू म्हणाला.....
"हे असं आहे मोहित..... हा एवढा भूतकाळ आहे ...आमी तुझ्यापासून लपवून ठेवला होता. आम्हाला वाटत होते की तू शिकून चांगला मोठा व्हावे... तू काहीतरी बनावे."






पार्वती.... मोहितच्या केसांमध्ये प्रेमळपणे हात फिरवत फिरवत बोलल्या...
"हे बघ मोहित्या.... साऱ्या गावाला माहित होतं की तू आमचा मुलगा नाहीस. ""




आता एवढ्या गोष्टी खऱ्या कळल्यानंतर मोहित भांबावून गेला होता. पण त्याला रस्ता शोधत पुढे जायचे होते आता
पण .....
पार्वतीचा  .....हात जो त्याच्या डोक्यातल्या केसांमधून प्रेमाने कूरवळत फिरत होता या स्पर्शांमधून त्याला केवळ आणि केवळ आईचे प्रेम जाणवत होते.



मोहित डोळे बंद करून पार्वतीबाईच्या हाताने होणारा स्पर्श केसांमध्ये ..... अनुभवत होता.
तो तो ती हळुवार., तसाच हात फिरवत होती.





अचानक मोहितला खाटेवर झोपून असल्यामुळे त्यातही एका कळावर होता तर पॅन्टातली चिट्ठी रुतली.




आणि त्याला आठवले की तिकडे मायरा वाट पाहत असेल. तसे त्याचे मन उद्विग्न झाले होते .त्याला जायची इच्छा नव्हती. पण ती तिकडे त्या एकांतात वाट पाहत असेल.
आणि हे गाव आणि त्यात या गावात असणारे लोक... त्यातही राजकारणी घरातली टवाळकी पोर... हे सर्व ध्यानात येताच तो झटकन उभा झाला....
तो उभा होताच कवडू आणि पार्वती कावरेबावरे होऊन त्याच्याकडे बघू लागले.
त्यांना वाटले आपण हे जे आता सत्य सांगितले आहे त्यामुळे तो त्यांच्यावर रागवलेला आहे...




पटापट तो हातांनीच त्याचे केस सावरले. जे कपडे घालून होता तेच व्यवस्थित केले. भरभर बाहेर आला आणि चप्पल घातली आणि निघाला.
तो तसा गेल्याबरोबर इकडे पार्वती रडू लागली. आणि कवडूचाही जीव कासावीस होऊ लागला.

.......



आपल्या आई-बाबांच्या मनस्थितीत पासून अनभिज्ञ मोहित भराभर पावले उचलत एका दिशेने निघाला गावाच्या..
संध्याकाळ होण्याच्या मार्गावर होती. त्याचा जीव धडधड करू लागला कारण ती तिथे एकटी होती. पोहोचायला त्याला पंधरा मिनिटे तरी लागणार होती.




जसा शॉर्टकट घेता येईल तसा तो शॉर्टकट घेत गेला तरी त्याला पोहोचायला बारा मिनिटे लागले.
पोचल्यानंतर तू इकडे तिकडे पाहू लागला...
पण तिथे.....



🌹🌹🌹🌹🌹