नियती - भाग 13

  • 4.4k
  • 3.4k

भाग -13मायराचे डोळे जड झाले हळूहळू आणि मग झोपून गेली तशीच....पहाटे चार चा प्रहर असेल... दूरवरून तिला शेरूचा भुंकण्याचा आवाज आला.... शेरू एवढ्या पहाटे असा का भुंकतोय...??? म्हणून ती डोळे किलकिले करत उठून समोर जाऊन खिडकीच्या गजांमधून बाहेर पाहू लागली.....तर अंधुक अंधुक असणाऱ्या प्रकाशामधून सडपातळ अशी आकृती गेटच्या आत येताना दिसली.... ती आकृती गेटच्या आत मध्ये बिनविरोध आली ... ना त्याला वॉचमनने अडवले... ना शेरुनी हाकलले... म्हणजे तो बंगल्यात नेहमी येणारा व्यक्ती असावा...मग कोण असावा हा... असा विचार करत ती डोळे बारीक करून बघू लागली.जसे जसे ती व्यक्ती जवळ येत होती तसं तसे तिचे चालण्याची ढब पाहून तिला वाटले की