स्वतंत्रता आपली की इतरांची

स्वतंत्र्यता तुमची की इतरांची?          *स्वातंत्र्य...... म्हणतात की भारतानं सन १९४७ ला स्वातंत्र्य मिळविलंय. तेही इंग्रजांपासून. भारत दिडशे वर्ष गुलाम होता. कोणी लोकं म्हणतात की भारत हा आधीपासूनच गुलाम होता. ज्यावेळेस आर्य आले. त्यांनी मुर्तीपुजा सांगीतली व आपण त्यावर विश्वास ठेवून मुर्तीची पुजा करु लागलो. शिवाय आपण आपल्या मनात अंधश्रद्धेचे बिजारोपण केले. विशेष म्हणजे त्या आर्यांनी आपल्या मनाचा ताबा घेतला. त्यासाठी साम दाम दंड आणि भेद हे चारही तत्व वापरले. त्यानंतर आपण त्यांचे आधीन झालो की ते काहीही म्हणोत. तीच पुर्वदिशा समजून वागत राहिलोत. त्यातच आपण त्यांचे एवढे आधीन झालो की त्यांनी ज्या ज्या कुप्रथा या देशात