स्वतंत्र्यता?

  • 1.1k
  • 396

स्वातंत्र्य आपल्याच लोकांपासून की इतर लोकांपासून?          *आज आपण पाहतो की प्रत्येकच समाजात तसंच जातीजातीत दोन गट आहेत. ज्यात एक गट दुसऱ्या गटाला निम्न समजतो. त्यांच्या भावभावनांची खिल्ली उडवत. त्यांना निरक्षर समजतो. शिवाय त्याचे तुटपुंजे विचार ऐकून घेत नाहीत व सांगतात आणि मिरवतात की आपण मोठे. पैशानं आणि अकलेनही. जे अकलेचे कांदेच असतात. तीच मंडळी आपल्या विचारानं इतर समाजातील लोकांचे गुलाम समजून वागत असतात नव्हे तर आपल्याही समाजाला दिशा न देता गुलामीसारखे वागवत असतात. त्यांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा न पोहोचवता त्यांनी लहानशेच व्यवसाय करावेत म्हणून त्यांना बाध्य करतात. खरं तर अशा संधीसाधू लोकांपासून आपण सावधान राहायला हवं.