हिंदुस्थानातही होत्या असल्या कुप्रथा माकड रुपातील मानव झाडावरुन खाली येताच त्यानं आपल्या पोटाची गरज पुर्ण करण्यासाठी कामाची निर्मिती केली व ही कामं सुकररितीनं पार पडावीत म्हणून त्यानं त्यावर एका व्यक्तीची देखरेख करण्यासाठी निवड केली. मात्र अशा व्यक्तीनं आपलाच स्वार्थ पाहात आपल्याला काहीच काम करावं लागू नये. तसंच आपलं इतर लोकांनी ऐकावं. आपल्याला त्रास देवू नये. आपण त्यांना हवेहवेसे वाटावे म्हणून मंदीर कल्पना आणली. त्यातच देवाचे भय दाखवून त्यात भावार्थ भरला. व्यतिरीक्त काही अंधश्रद्धाही भरल्या. पहिली अंधश्रद्धा होती रथयात्रा. त्या व्यक्तीनं देवाच्या नावानं रथ काढण्याची प्रथा सुरु केली होती. तो रथयात्रा काढायचा व त्या रथाखाली लोकांना झोपावयास