मुक्त व्हायचंय मला - भाग २

  • 3.8k
  • 1
  • 3.1k

मुक्त व्हायचंय मला भाग २मागील भागावरून पुढे…मुलांचं मागे येणं, रडवेला चेहरा करून बोलणं मालती बाईंना मनातून रडवून गेलं पण आता त्यांनी ठाम निर्णय घेतला होता. विचार करता करता मालतीला त्यांना बघायला जेव्हा रघुवीर आले होते तो दिवस आठवला.रघूवीर त्यांचे काका काकू त्याची चुलत बहीण  असे सगळे मालतीला बघायला आले होते."याया बसा. घर सापडायला त्रास नाही गेला नं !" मालतीची आई"नाही नाही. तुम्ही पत्ता अगदी बरोबर सांगीतल्यामुळे आम्ही सहजपणे घर शोधू शकलो."रघूवीर चे काका म्हणाले."चंदू पाणी आण." मालतीचे वडील चंदूला मालतीच्या भावाला म्हणाले."हो आणतो." चंदूचंदू पाणी आणायला आत वळला पण तेवढ्यात नंदाने त्याच्या बायकोने पाणी आणलं."हा माझा मोठा मुलगा चंदू .त्याचं