जर ती असती - 4

  • 2.7k
  • 1.9k

समर ने स्वराला बेडवर नेऊन झोपवलं आणि पटकन विनोदला फोन करून बोलवून घेतलं....श्रीधर समर सोबत सारखा बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण समर श्रीधरला टाळत होता, त्याच्या मनात श्रीधरला घेऊन खूप प्रश्न होते त्याला त्याच्यासोबत बोलायची अजिबात इच्छा नव्हती, समरला माहीत होतं काही झालं तरी त्याचे बाबा त्याला काही सांगणार नाही म्हणून तो शांत झाला होता....."समर, स्वराला दवाखान्यात भरती करशील तर बरं होईल, तसही आता डिलिव्हरी पण जवळ अली आहे आणि सध्या तिची हालत ठीक नाहीये, so better होईल की तिला भरती कर".... विनोद"ठीक आहे काका"...... समरसमर स्वराला दवाखान्यात घेऊन गेला, तिथं तिला भरती केलं, पूर्ण दिवस समर तिथच बसून होता,