भाग 37.......पार्वती पुढे म्हणाल्या...." बरं ...आता निघा.. नाहीतर उशीर होईल गाडी चुकल..."असे म्हणून पार्वतीने दोघांनाही हृदयाशी लावले...दोघेही जड अंत:करणाने कवडूसोबत सामान घेऊन एक नजर पार्वतीकडे पाहून पुढे निघाले..... ते तिघेही दिसेनासे होत पर्यंत पार्वती तिथेच उभी राहिली..... काळोखातून जात असलेले तिघेही चाचपडत पुढे पुढे पाऊले टाकत होते...कवडू पुढे पुढे निघाला.... रस्ता माहित असल्यामुळे सरसर ... चालत होता आणि त्याच्या मागे...हे दोघेही.... पण.... मायराला चालताना अडथळा येत होता.सुखवस्तु असलेल्या घरी जन्माला आलेली ती...तिला एवढे पायदळ चालण्याची सवय नव्हती. तिच्यामुळे ते दोघे हळूहळू चालत होती...हे लक्षात येताच समोर गेलेला कवडू थांबला ..आणि म्हणाला...."अरे सुनबाईचा... हात पकडून चल... म्हणजे थोडं लवकर चालता येईल.तसे