नियती - भाग 37 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 37













भाग 37

.
.
.
.
.
.
.



पार्वती पुढे म्हणाल्या....
" बरं ...आता निघा.. नाहीतर उशीर होईल गाडी चुकल..."

असे म्हणून पार्वतीने दोघांनाही हृदयाशी लावले...

दोघेही जड अंत:करणाने कवडूसोबत सामान घेऊन एक नजर पार्वतीकडे पाहून पुढे निघाले..... ते तिघेही दिसेनासे होत पर्यंत पार्वती तिथेच उभी राहिली..

... काळोखातून जात असलेले तिघेही चाचपडत पुढे पुढे पाऊले टाकत होते...
कवडू पुढे पुढे निघाला.... रस्ता माहित असल्यामुळे सरसर ... चालत होता आणि त्याच्या मागे...
हे दोघेही....




पण.... मायराला चालताना अडथळा येत होता.
सुखवस्तु असलेल्या घरी जन्माला आलेली ती...
तिला एवढे पायदळ चालण्याची सवय नव्हती.



तिच्यामुळे ते दोघे हळूहळू चालत होती...
हे लक्षात येताच समोर गेलेला कवडू थांबला ..
आणि म्हणाला....
"अरे सुनबाईचा... हात पकडून चल... म्हणजे थोडं लवकर चालता येईल.

तसे मग मोहित ने तिचा हात पकडला आणि चालू लागला.


जवळपास 45 मिनिटात स्टेशनवर पोहोचले...
दहा मिनिटे थांबत नाही तोपर्यंत ट्रेन आली...
दोघांनीही कवडूचा आशीर्वाद घेतला आणि गाडीमध्ये बसले...


.......







इकडे गावात.... वाड्यामध्ये आता सर्व झोपी गेलेले...




नानाजी ही सुंदर सोबत आल्यानंतर मानसिक रित्या थकले असल्यामुळे बेडवर लेटताच झोपी गेले....




सुंदर मात्र तळमळत होता...





त्याला आता थोड्यावेळापूर्वीच कळले होते की माळरानाच्या घरात सर्व पोलीस ताफा आणि फौजदार साहेब आराम करत आहेत.....

आणि मूळकाट खाटीकही... आपल्या ठिकाणी दबा धरून बसलेला आहे....

शेवटी अगदीच असह्य झाल्यामुळे सुंदर पहाटे पहाटे हळूच बाहेर आला आणि त्याने आपली बाईक अशीच ढकलत दूरपर्यंत नेली.. आणि मग चालू करून निघाला....






त्याच्या गाडीने वळंण स्मशानभूमीकडे घेतलं.......


गाडी मोहितच्या घरापासून लांबच उभी ठेवली...





चोर पावलाने .... दारापर्यंत आला..... घराच्या समोर च्या बाजूला लहानशी चौरस लोखंडी ......उभे लोखंडी राडाचे गज असलेली छोटीशी खिडकी होती ....तेथून वाकून बघू लागला...






आत मधल्या दिव्याच्या मंद प्रकाशात......
एका खाटेवर असं वाटत होते की दोघजण झोपलेले असून पांघरून घेऊन आहे... आणि खाली जमिनीवर चटईवर बहुतेक वाकड टाकलेली असावी आणि त्यावर कोणीतरी एक जण झोपून आहे....





तो सूंदर विचार करू लागला....
"घरात चार जण पाहिजे.... दिसत का नाही चार जण...??
काय गडबड आहे....??? मोहित आणि मायरा आजंच तर नाही गेले...???"

विचार करूनच त्याला आणखीन क्रोधाने खदखदून आले.





आता तो प्रयत्न करू लागला की दरवाजा कसा खोलावा..
त्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हते.... त्याचा प्लॅन फिसकटला तर तो सहन करणार नव्हता....






दरवाजाच्या फटीतून तो बोट टाकायचा प्रयत्न करू लागला...
पण काही केल्या ती फट एवढी ....बारीक होती की त्यातून त्याचे बोट जाऊ शकत नव्हते...






आत मध्ये पार्वती खाली जमिनीवर चटई टाकून त्यावर वाकड एक टाकलेली तर त्यावर त्या लेटल्या होत्या... त्यांना झोप लागलेली नव्हती....... एकतर कवडू घरी यायचे होते... आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच मुलगा आणि सून गेलेले... त्यामुळे आता यामुळे तिला घरात भकास वाटू लागलं होतं... काही केल तरी तिला झोप लागत नव्हती.. ही तशीच डोळे मिटून पडलेली होती पांघरून घेऊन....


तिला आता दरवाजवळ खुडबुड ऐकायला येऊ लागली...
तिला वाटले कवडू  परत आलाय.....

पार्वती....
"आवं... आले का तुम्ही...?? थांबा थांबा दरवाजा खोलतो..."


पार्वतीचा आवाज आल्याबरोबर सुंदर सावध झाला....
तिच्या बोलण्यावरून हे तर समजलं की ती कवडू ची वाट बघते आहे.




पण हे समजलं नाही की घरामध्ये...
खाटेवर  मायरा आणि मोहित आहे का...??
पण खाटेवर दोघे एका ठिकाणी कसे असू शकतील...?? कारण मंद प्रकाशामध्ये... दिसत होतं की बाजूलाच खाली पार्वती झोपलेल्या होत्या....






विचार करत असतानाच दरवाजा खोलला गेला...




दरवाज्याच्या जवळ असलेला सुंदर... त्याच्या परफ्युम आणि मानवीय सुगंधाने........ पार्वतीने ओळखलेले लगेच दरवाजा खुलल्याबरोबर त्याच्याकडे न पाहताही...
.
.
.
.

घरी पहाटे एवढ्या अंधारात कोणीच नसताना ...तसा ... तो असा दारात दिसला तर तिने..... घाबरून ओरडण्यासाठी प्रयत्न केला....

पण सुंदर ने पार्वतीच्या तोंडावर हात ठेवला.. करकचून असा की तिला श्वास गुदमरतोय की काय असं वाटू लागलं...
तशीच तिला तो आतमध्ये घेऊन आला आणि दार लावले....






दार लावल्याबरोबर पार्वती आणखीन जास्त घाबरली आणि ते हाताने त्याला मारू लागली...
त्यावर याने तसेच तिला भिंतीला टेकून दाबून धरल्याचे जेणेकरून तिचा आवाज बाहेर जाऊ नये.






पार्वतीच्या तोंडावर हात तसाच ठेवून... सुंदर ने डाव्या हाताने मोबाईल घेऊन कॉल लावण्याचा प्रयत्न केला... पण पार्वती हातपाय झाडंत असल्यामुळे... त्याला काही कॉल लावणे जमले नाही... तसेच चिडून रागाने त्याने खाटेवर असणाऱ्या पांघरूणावर एक लाथेने झटका देऊन वर उडवले.. तर तेथे त्याला पांघरून आणि कपडे ठेवलेले दिसले...





आता पुन्हा तो चिढत .... डाव्या हाताने पार्वतीचे जे तोंड दाबून धरले होते आपोआप त्या दाबामध्ये वाढ झाली...



घट्ट नाकतोंड तसंच दाबून धरत.....
"ए बूढे... कुठेय तुझा पोरगा आणं सून...??"





सुंदर दातओठ खात पार्वतीला तसेच दाबून धरत म्हणाला...
जवळपास सहा..सात मिनिटे झाले.... तसेच दाबून ठेवत...
एक मिनिटापूर्वी पार्वती हात पाय झाडत होती... तरी त्याच्या काही लक्षात आले नाही रागा रागात...
आता पर्वतीची हालचाल थांबली होती...





हालचाल थांबल्यानंतर त्याच्या लक्षात आले तर त्याने आत्ता कुठे तो डावा हात तिच्या नाका तोंडावरून काढला... तशी ती एखादा वृक्ष उन्मळून खाली पडावा त्याप्रमाणे ती पडली.


ती खाली पडल्यावर... त्याच्या हृदयात धस्स झाले...
खाली वाकून तिच्या नाकाजवळ आडवे बोट नेऊन पाहिले...





तसं त्याला समजले की पार्वतीने जीव सोडला...




आता तो थोडा मनातून हादरला...





सुंदर (मनात)...
"आता इथून आपल्याला पटकन पळून जावे लागेल... गावातंच फौजदाराने ठाणं मांडलेले आहे दोन दिवस..."

असा तो विचार करत पुन्हा तिच्या गळ्यावर उलटे बोट ठेवून
पडताळा करत असतो...
तेव्हा दाराची कडीत पाटीतून बोट टाकत ती खोलून अगदी त्याच वेळेला कवडू येतो...
पार्वती खाली झोपलेली आणि हा तिच्या गळ्याजवळ काहीतरी करतोय... असा दृश्य कवडूला दिसलं....तर सुंदर अचानक कवडूला पाहून पार्वतीला भरकन सोडून देतो...
आणि पटकन उभा होऊन.... त्याच्या रस्त्याला आडवा झालेल्या....कवडूची गच्ची पकडतो... तरुण रक्ताचा हात 
सुंदरचा .....बिचारा कवडू...त्याला एवढ्या प्रेशरनं पकडल्या जातं... की त्याच्या तोंडून उद्गारच फुटत नाही.





तसाच तो सुंदर कवडूला.... त्याला ढकलंत ढकलंत भिंतीकडे पकडत सरकवत नेतो... पण सुंदरला हे ही समजून येतं की कवडू कमजोर माणूस नाही.... त्याला दाबून धरायला कठीण जात होते... तर आता सुंदरने लगेच योग्य संधी साधून 
झटकन जवळच असलेली खाटेवरील उशी घेतली आणि त्याच्या तोंडावर दाबली.....





कवडू झटपट करीत होता पण सुंदर काही सोडायला तयार नव्हता.... पाच मिनिटेही  नाही लागली  झटापट थांबवायला...
तसं पाहता सुंदरला दोघांना मारायचं नव्हतं. पण आता ते झालेलं होतं त्याच्या हाताने...




......




झटापट थांबली तशी सुंदर  काय समजायचं ते समजला...
त्याने लागोलाग तपासूनही पाहिले...




सुंदरने कवडूला तसेच भिंतीलगत बसवून ठेवून दिले.....
आणि पटकन बाहेर निघाला...






बाहेर अजूनही उजाळले नव्हते.... एकही चिटपाखरू सुद्धा बाहेर नव्हतं... सर्व पहाटेच्या साखर झोपेत असावेत...
इकडे तिकडे पाहत सुंदर... त्या दूर ठेवलेल्या स्वतःच्या बाईककडे गेला आणि... बाईक घेतली आणि घराकडे निघाला.






त्याला आता कुणालाही लक्षात येण्याच्या अगोदर घरी जाऊन झोपायचे होते... त्याच्या हाताने आज जे कृत्य झाले त्याच्याने तो भेदरला होता मनातून.....


वाड्याच्या बाहेरच बाईक बंद केली...  हळूच आवाज न करता गेट खोलले आणि बाईक हळुहळू आत मध्ये आणून ठेवली.






कपडे बदलले आणि आपल्या जागेवर जाऊन झोपला. पण अस्वस्थपणे कूस बदलत राहिला... आताही त्याला अजिबात झोप येत नव्हती.... त्याच्या प्लॅनिंग मध्ये जे होतं त्याप्रमाणे झालं नव्हतं... आणि भलतंच काहीतरी होऊन बसलं होतं त्याच्या हाताने....


फौजदाराने ठेवलेल्या सिव्हिल ड्रेसमध्ये असणारा तो शिपाई...... जो मोहितच्या घरावर लक्ष ठेवून होता.
पण त्याला पहाटे तेथेच टेकून बसल्या बसली झोप लागलेली..... त्याला सुंदर ने गाडी सुरू केली त्या आवाजाने जाग आलेली आणि गाडी घेऊन जाणारा त्याला सुंदरही दिसला...


तसेच बाबाराव यांनी सुद्धा आपल्या परीने त्या घरावर नजर ठेवायला सांगितलेली.... त्यांचा जो माणूस होता... त्यानेही बंगल्यापर्यंत बातमी पोहोचवलेली..
की पहाटे सुंदर मोहितच्या घरून बाहेर निघाला.....





राम तर घरी गेलेला होता... बाबाराव एकटेच उभे राहून बंगल्याच्या खिडकीतून पाहत विचार करत होते ....
की.....
"का गेला असावा सुंदर त्यांच्या घरी...??
मायरा आणि मोहित ठीक असतील ना....!!!"







हजार प्रश्न उमटंत होते डोक्यामध्ये‌....
ते आता सकाळ होण्याची वाट पाहू लागले... एकदाचा राम सकाळी घरी आला की मग त्याच्याकडे हे सोपवून माहिती करून घ्यायची.... त्यांना आता काय झाले ?? हे माहित झाल्याशिवाय चैन पडणार नव्हते.






🌹🌹🌹🌹🌹