भाग ३ मंदा काकू नमिताबाईना धीर देण्याशिवाय काय करु शकत होत्या? शेवटी नवरा - बायकोच्या संसारात अशी छोठ मोठी भांडण होत असतात अस सांगून त्या निघुन गेल्या.. पण मंदाकाकूंना हे ठावूक नव्हत , की ही तर फक्त अशुभाच्या संकटाची वाळवी लागण्यापुर्वीची चाहुल आहे - सुरुवात आहे , पुढे पुढे तर भयंकर घटना घडणार होत्या. त्या दिवशी सुद्धा विकासराव दारु पिऊन आले , दरवाज्यात ठेपाळले - कडीचा खडखड आवाज झाला.. ! तो आवाज ऐकून संध्याकाळच जेवण बनवणा-या नमिता जराश्या घाईतच बाहेर आल्या. त्या एकटक मळूल नजरेने विकासरावांकडे पाहत होत्या