क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 25

भाग. ४         " ठक...ठक..!"   दार ठोठावण्याचा आवाज  येताच माधुरी बाईंनी खाडकन डोळे उघड़ले , अंथरुणातच उठुन बसल्या..     " ईतक्या रात्री कोण असेल?" माधुरीबाई स्वत:शीच म्हंटल्या.        " ठक..ठक...!" पुन्हा दारावर ठोठावल गेल.  माधुरीबाई हळूच जागेवरुन उठल्या  , दरवाज्यापाशी पोहचल्या आणि दरवाजा उघड़ण्यासाठी त्यांनी कडीवर हात ठेवला..         पन माधुरीबाईंनी कडी उघड़ली नाही, कारण      त्यांना वेळीच आपल्या आईची एक गोष्ट लक्षात आली होती..           की   भुतखेत , दोनदाच दरवाजा ठोठावतात ..तिस-यांदा ठोठवत नाही,  ह्या सृष्टीच्या रचेत्याचे -निर्मात्याचे काही नियम आहेत , ज्या नियमांना  बाळगूणच त्या आनिष्ठ शक्तिंना ईथे आसरा मिळाला आहे..