भाग ५ महादेव महिमा आंतिम आणी त्यांच्या वाक्यासरशी एक विलक्षण भयकारक गोष्ट घडली, बाजूलाच अंथरुणात झोपलेला अमर खाडकन जागेवर उठून बसला.. वटारलेल्या जळजळीत नजरेने तो रमाबाईंकडे पाहत होता.. ती नजर एका दहा वर्षाच्या सामान्य मुलाची मुळीच वाटत नव्हती.. त्या नजरेत द्वेष,संताप, क्रोध सर्वाँच मिश्रण होत.. घशातून गुरगुरल्यासारखा आवाज काढ़त अमर कधी - माधुरीबाईंकडे तर कधी रमाबाईंकडे पाहत होता .. " अमर ? बाळा काय होतंय तुला असं का करतोयस..!" माधुरीबाईंनी अमरला काळजीच्या सुरात विचारल. पन प्रतिउत्तर अस आलं की ज्याचा