"प्रत्येकाची काही न काही आवड ही असतेच. कुणाला आपली आवड जोपासण्याची संधी मिळते तर कुणी आपल्या जबाबदऱ्यांमध्ये इतके अडकून जातात की कोणे एकेकाळी आपली काही आवड ही होती हेच त विसरून जातात."रुद्राणीची कथा ही काहीशी अशीच आहे.रुद्राणी एक चांगली सुशिक्षित सुस्वभावी सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलगी होती. तिच्या घरी आई वडील बहीण भाऊ असा मोठा परिवार होता रुद्राणी सगळ्यांची लाडकी होती अगदी लहान भावंडांची सुद्धा घरात त्यांना काहीही लागलं तर आई बाबां ऐवजी ते रुद्राणीलाच सांगत असे. रुद्राणी खेळकर स्वभावाची मुलगी होती तिला गाण्याची खूप आवड होती. म्हणून तिच्या वडिलांनी तिला गाण्याचा क्लास लावला होता. रुद्राणी जितकी दिसायला सुंदर होती तितकीच ती