नियती - भाग 45

भाग 45शेठजी सोबत बोलताना जुली मायराकडे आत्ताही संतापूनंच पाहत होती तर म्हाताऱ्या बाईंनी डोळ्यांनी इशारा केला जूलीला ......तसे मग जुली बाहेर उभी राहून बोलू लागलेली.एवढी रडत होती मायरा तरीही तिने तिची तीक्ष्ण नजर दोघींवर ठेवली होती.... त्या दोघींचाही झालेला इशारा मायराने पाहिला होता.त्या म्हाताऱ्या बाईने मायराला समजावले प्रेमाने....की  येथे एकदा आलेली मुलगी परत जाऊ शकत नाही.. आणि परत केली तरी घरचे लोक परत आपल्या घरात घेत नाही... त्यामुळे हेच आपलं नशीब समजायचं आणि इथे राहायचं...त्यावर मायरा काहीही बोलली नाही आणि ती म्हातारी बाई तिच्या डोक्यावरून कुरवाळंत हळूच कन्हंत उठली आणि मायराला पलंगावर झोपण्यास सांगून ती रूमच्याबाहेर आपल्या खोलीकडे गेली.म्हातारीबाई जाऊन अर्धा