नियती - भाग 45 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 45









भाग 45






शेठजी सोबत बोलताना जुली मायराकडे आत्ताही संतापूनंच पाहत होती तर म्हाताऱ्या बाईंनी डोळ्यांनी इशारा केला जूलीला ....



..तसे मग जुली बाहेर उभी राहून बोलू लागलेली.
एवढी रडत होती मायरा तरीही तिने तिची तीक्ष्ण नजर दोघींवर ठेवली होती.... त्या दोघींचाही झालेला इशारा मायराने पाहिला होता.




त्या म्हाताऱ्या बाईने मायराला समजावले प्रेमाने....की  येथे एकदा आलेली मुलगी परत जाऊ शकत नाही.. आणि परत केली तरी घरचे लोक परत आपल्या घरात घेत नाही... त्यामुळे हेच आपलं नशीब समजायचं आणि इथे राहायचं...





त्यावर मायरा काहीही बोलली नाही आणि ती म्हातारी बाई तिच्या डोक्यावरून कुरवाळंत हळूच कन्हंत उठली आणि मायराला पलंगावर झोपण्यास सांगून ती रूमच्याबाहेर 
आपल्या खोलीकडे गेली.





म्हातारीबाई जाऊन अर्धा तास वगैरे झाला असेल आणि जॅक आला. त्याच्या आवाजानेच मायराने टक्क डोळे खोलले 
बसल्या बसलीच.





जुली ने त्याच्याकडे पाहून ......एकही गोष्ट केली नाही 
त्याच्यासोबत फोनवरच बोलत राहिली..... त्याने आल्यावर मायराकडे कटाक्ष टाकला... त्याच्या नजरेत भयंकर संताप आणि चीढ दिसत होती मायराला. 
पण त्याला मायराविषयीचे एक आकर्षण निर्माण झाले होते. एक .......एक आगळी वेगळी सौंदर्याने मुसमुसलेलं ...
......भरलेलं लावण्या अंगात असलेली....मायरा....






तो आपल्या पोटात दारू टाकूनच आला होता. 
आता तो मायराजवळ आला तसा मायराला भपकन वास आला दारूचा...





दारूच्या वासाबरोबर ... त्याच्या अंगातल्या कपड्याची आणि घामाची दुर्गंधी आली. .......
घाणेरडेपणा असलेला असा दुर्गंध कारमध्येही तिला जाणवला होता. एक तर त्याच्याबद्दल मनापासुन घृणास्पद वाटणे हे सुद्धा एक कारण होतं.





खिडकीच्या बाहेर जुली उभी राहुन फोनवर बोलत होती.
एका तिरप्या नजरेने आत मध्ये ही बघत होती तरीही 
मायराच्या जवळ येऊन त्याने तिला  मिठीत घेतले....
त्याने तसे केल्याबरोबर जुली बाहेर हसत होती त्याच्याकडे पाहून. .........पण त्याचा हात लागल्याबरोबर मायरा नागिणीसारखी फुस्कारली....


त्याच्या मिठीत तो आवळू पाहणारा तिचे शरीर....
तिने संधी साधून त्याच्या मांडीत एक लात मारली ..
आणि त्याला दूर ढकलले. 





नशेमध्ये असलेला तो दूर ढकलला गेला तसा त्याने
चिडत पुन्हा शिव्या देतंच उठला आणि पुन्हा 
तिच्या अंगावर आला... 





बाहेरून जुली पाहत होती सर्व ....पण तिच्या मनात मायराच्या लज्जा रक्षणाबाबत अजिबात विचार आला नाही... 
जणू तिचे नेहमीचं पाहणं असावं याप्रमाणे ती फोनवर हसून बोलंत.... आतलं दृश्य पहात होती....







इकडे मायराचा विरोध जॅकच्या पुरूषी जोरापुढे कमजोर पडत होता... तो जोर लावून मायराच्या तोंडात आपले तोंड नेऊ पाहत होता.....




त्याला विरोध करून मायरा हताश झाली होती.
हातामधला जोर आता कमी पडू लागला होता... 



अगदीच तोंडाजवळ तोंड आल्यावर जॅक चे मायराला न राहवून .......आधीच किळसवाणे वाटत होते... तर ती
त्याच्या तोंडावर किंचाळत थुंकली... जॅक मधील आता 
पशू जागा झाला ...तो मायरावर तुटून पडला.





इकडे पुन्हा मायराने सर्व शक्ती एकवटून जॅकला ढकलून दिले... तेवढ्यात दार वाजले... दारावर एक कोणत्यातरी श्रीमंत व्यक्तीचा एक ड्रायव्हर असावा असा व्यक्ती होता...




जुली ने दार उघडून पाहिले...तो एक ड्रायव्हरंच होता.


त्या  ड्रायव्हरला  पाहताच जुलीच्या चेहऱ्यावर खुशीचे हास्य उमलले. आणि त्या ड्रायव्हरला पुढे काहीही बोलायची गरज उरली नव्हती.....



जूली काय समजायचे ते समजली...
ज्या ज्यावेळी असा तो ड्रायव्हर तिच्या खोलीच्या दाराशी यायचा त्या त्यावेळी जुलीने एकच अर्थ समजायचे... तो म्हणजे...
" खाली बिल्डिंगच्या समोर गाडी उभी आहे आणि त्या
गाडीमध्ये तिचे एक जुने पण श्रीमंत शेठजी ग्राहक वाट 
पाहत बसले आहे... "






ती अशी संधी कधीही कितीही थकलेली असली तरी वाया जाऊ देत नव्हती. ती त्यावेळी एकंच काम करायची.... 
एक नशीली गोळी खायची. पटकन आपला साजशृंगार करायची त्या शेठजींना आवडते तसे.... आणि त्यांना आवडेल असा शृंगारिक ड्रेस किंवा साडी परिधान करून खालच्या गाडीत जाऊन बसायचं...

असे प्रसंग महिन्यातून एकदाच यायचे... 





आता ही ती नित्याप्रमाणे खाली गाडीत जाऊन बसली.

जॅकला ईकडे समजले ...आता ती सकाळी पाच ते सहा वाजताच येणार त्याच गाडीतून...





जुली गेली आणि आता त्या खोलीमध्ये फक्त दोघेच उरले होते... एक जॅक आणि दुसरी मायरा

जॅक मायरावर पुन्हा आक्रमण केल्यासारखा अंगावर आला आणि मायरा त्याला जीव तोडून प्रतिकार करू लागली.





एखादा बोका जसा चिमणीवर झडप घालतो त्याप्रमाणे जॅक मायरावर झडप घालत होता आणि ती चिमणी प्रमाणे प्रतिकार करत होती. 



जॅकने.....आपल्या जवळची पुन्हा एक दारूची बाटली बाहेर काढली..... त्यातली.... थोडा उभा राहून स्वतः प्यायला आणि अर्धी मायराने प्यावी म्हणून तिच्यासमोर येऊन तिच्या हाताला खस्सकन ओढून तिच्या तोंडाला लावू लागला....
ती बाटलीतील दारू प्यायला तयार नव्हती  तर तिला त्याने खाली पडले आणि तिला पकडून तिच्या घशात ओतण्याचा प्रयत्न करू लागला....पण मायराने आपले दात घट्ट पकडून ठेवले होते....

त्यामुळे ती दारू तिच्या घशात उतरू शकत नव्हती ...
तिचा हा जोरदार प्रतिकार पाहून आणखी जॅक संतापत होता.


त्याने रागाने तिची ओढणी तर केव्हाच फेकून दिली होती .
आता तिच्या पाठीमागच्या गळ्याजवळून संतापत त्याने  
कुर्त्याला हात घालून पकडले....






आणि तिच्या पाठीवरची कुर्त्याला असलेली झिप ओढू लागला खाली .....तसा त्याच्या दुसऱ्या हाताचा जोर लागल्यामुळे मायराच्या डाव्या साईडचा भाग खांद्यावरून पाठीवर खालपर्यंत फाटला....


आता मायराही संतापाने लाल होऊन चवताळली.





तिच्या हातात त्याचा एक डावा हात लागला तर ती त्याला हाताला कडकडून चावली....

त्याच्या अंगाची शिसारी येत होती तरी कडकडून चावली.





तो वेदनेने विव्हळू लागला आणि आता त्याच्यात राक्षस अवतरला पुन्हा एकदा.....





त्याने जोरात ओढून आपला हात तिच्या दातांमधून मुक्त केला आणि सोबतंच शिव्यांचा भडीमार केला.. संतापाने लाही लाही होऊन खिशातून सुरा बाहेर काढला.....




तिला गच्च आपल्याजवळ एका हाताने पकडून घेत तिच्या मानेवर सुरा ठेवला....
आणि तिलाच स्वतःचे कपडे काढण्यास आदेश दिला...




अगोदरंच त्याने कुर्ता फाडल्यामुळे... ती स्वतःचा कसा बसा कुर्ता सावरंत होती.
आता तो तर तिच्या अब्रूचा घास घेण्यास पूर्णतः तयार होता.





त्याचा तो चवताळलेला अवतार पाहून आणि त्याने फर्मावलेले वाक्य ऐकून मायरा घाबरली आणि भीतीने थरथर कापू लागली आणि आता अब्रू चव्हाट्यावर येईल म्हणून तिला शरम वाटू लागली होती.



पण हे तिला दोन-तीन क्षणांसाठी वाटले नंतर मात्र ती....
तिला त्याचा संताप वाटू लागला आणि अंगार...
अंगात भडकून लाही लाही होऊ लागली .....
किंचित भीतीची लाटही सर्वांगाला स्पर्शून जात होती....
तिचे शरीर आतून थरथरत होते ....ते तिलाच माहीत होते.






तिने पक्के पक्के ठरवले होते ....तेवढ्याच क्षणांत ...
की काहीही झालं तरी आपली अब्रू वाचवायची म्हणजे वाचवायची .....अगदी प्राण गेले तरी चालेल पण ...
या राक्षसाच्या हातात आपली अब्रू दान द्यायची नाही....




पण.........पण तिला आत्ताच मरायचे नव्हते.. 
तिला मोहितसाठी जगायचे होते.. 
त्याचा जीव बनली होती ती... स्वतःहून... 
तिच्या हिमतीवर त्याने गरीब असूनही प्रेम करण्याची हिम्मत केली होती तिच्याशी.... 
पण ....
जर आता तिला काही झालं तर तोही जीवन जगू 
शकणार नाही याची तिला पूर्ण खात्री होती.
आणि म्हणून तिला जगायचे होते .....




आपला अपुरा संसार पूर्ण करायचे होते...
त्याला अर्ध्यात सोडायचे नव्हते ......तिला त्याच्यासोबत शेवटपर्यंत संसार करायचा होता.....
त्याच्या जीवनातला एक अविभाज्य घटक होती ती...




स्वतःला वाचवण्यासाठी या घरामध्ये कितीही आरडाओरडा केला तरीही तिला कोणीही मदतीला येणार नव्हते तिला पक्के माहिती होते. मायराचे मन बधीर झाले ..........
तिचा प्रतिकार कमी झाला..... शरीराची धडपड तिच्या मंदावली हे जॅकच्या लक्षात आले.....


आता त्याने त्याच्या हातातील सुरा बाजूला ठेवून दिला.
आणि त्याने आपल्या अंगातले टी-शर्ट काढून बाजूला फेकून दिले आणि स्वतःचे उघडे शरीराचा स्पर्श करण्यासाठी तो तिच्याजवळ जात होता......
तर आणखी जवळ येऊ लागला आणि मायरासुद्धा बधीरपणे तशीच स्वस्थ पडून होती....


तो  तिच्या अंगाच्या दिशेने येऊ लागला तर तिला त्याच्या चेहऱ्याकडे पहायची इच्छा नव्हती... किळसवाणे वाटत होते त्यासाठी ती बाजूला मान वळवून बघू लागली आणि
तिचे डोळे चमकले पण क्षणभरंच.....


जॅक तिच्या शरीरावर ओणवा होऊ लागला आणि तिच्या चेहऱ्याकडे आपले तोंड आणू लागला ... आणखी पुन्हा 
थोडा जवळ येऊ लागला .....





पण त्याच्या तोंडून आता एक अस्फूट किंकाळी बाहेर पडली आणि त्या बंद खोलीत  मायराच्या गळ्याजवळ 
रक्ताचे कारंजे ऊडू लागले...





अतिशय चपळाईने तिने बाजूला पडलेला जॅकच्या
त्या चाकूला हात घातला होता आणि त्याच्या लक्षात यायच्या अगोदरंच तो सुरा त्याच्या गळ्यावरून पूर्ण ताकदीने फिरवला होता.....



तिने एका झटक्यात त्याला ढकलून दिले आणि पटकन उठली. जॅक हातपाय झाडत पडला जागेवर..... त्याच्या तोंडातून किंचितही आवाज उठत नव्हता..... पण संपूर्ण शरीर तडफड करत होते ....संबंध खोली पूर्ण रक्ताने भरू लागली...





हे असं भयानक दृश्य पाहून मायराला चक्कर आल्यासारखे वाटले आणि तशाच अवस्थेत.....मग...


🌹🌹🌹🌹🌹