#चैत्र#गौरीची_तीज #चैत्रगौरीचे_हळदी_कुंकूचैत्र गौरींचे हळदी कुंकू हा चैत्र महिन्यात मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला एक पारंपरिक सोहळा आहे. स्त्रिया आपापल्या घरी हा समारंभ साजरा करतात. गौरीच्या तिजे दिवशी एका छोट्या पितळी झोपाळ्यावर गौरीची स्थापना करतात, व महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावतात.याला चैत्र गौरीचे माहेरपण केले जाते असे म्हणतात पाडवा झाला की या हळदी कुंकवाचे वेध सुरू होत असत हे हळदी कुंकू चैत्र शुद्ध तृतीये पासून अक्षय तृतीये पर्यन्त कधीही एखाद्या मंगळवारी शुक्रवारी अथवा रविवारी केले जात असे .गौरीला सौभाग्याचे “दान “मागणे तसेच घरात सुबत्ता आणि मुलांचे सुखसमाधान असावे हा याचा हेतु असायचातसेच पूर्वीच्या काळी नोकरी धंदा वा इतर कोणत्याच कारणा साठी बायका फारशा घराबाहेर