नवजात शिशू चे प्राण घेऊन त्याने शैतानी देवताची स्थापना केली व त्याला गावातील बाया माणसे व लहान मुलांचा तो बळी देऊ लागला.श्वेतकमल कडे श्रिमंती आली , धनदौलत आली , त्याला आपल्यात शैतानी शक्तींचे अस्तित्व जानवू लागले. श्वेतकमल त्या शक्तींचा उपयोग माणसांचा बळी देण्यासाठी करू लागला. कोणत्याही माणसाला तो त्याला हवे तसे संमोहीत करू लागला व त्याच्या जाळ्यात अडकलेल्या माणसांचा तो बळी देऊ लागला.एकामागून एक असे असे गावातील बाया माणसे व मुले बेपत्ता होऊ लागली. गावात एक प्रकारची दहशत निर्माण झाली. लोक रात्री अपरात्री घराबाहेर पडण्यास धजावू लागली. दिवसाही एकट्या दुकट्याने फिरण्याससुध्दा घाबरू लागले .गावातील शांती भंग झाली