नियती - भाग 56

भाग 56आता अंधार पडायला आला होता... दोघीही तेथून निघाल्या.... घरी आल्या.... आता अंधार गडद होऊ लागला... आल्या आल्या दोघीही सायंकाळच्या स्वयंपाकाला लागल्या....मोहित आज जरा उशिराच घरी आला....तर... तिथे...वॉचमन काकाच्या खोलीमध्ये....सावित्री काकू आणि वॉचमन काका यांचे बोलण्याचे जोरजोराने आवाज येत होते... आणि.... मायरा समजावण्याचा प्रयत्न करत होती दोघांना....मोहित तिथे आला तसे मायराचे लक्ष त्याच्याकडे गेले...त्याने इशारा करून मायराला जवळ बोलावले...आणि विचारले...."काय करत आहेस तू त्यांच्या घरी...???""अरे ....वॉचमन काका आणि सावित्री काकूंचे भांडण  चालू आहे.""मग त्यांच्या भांडणांमध्ये तू का गेली..??ते त्यांचं बघतील... तू काय करते आहेस तिथे...??""ते त्यांचं बघतील म्हणजे...""अगं ....त्यांना त्यांचं सार्ट आऊट करू दे ना... तू त्यांच्या मध्ये लुडबुड कशाला