नियती - भाग 56 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 56




भाग 56


आता अंधार पडायला आला होता... दोघीही तेथून निघाल्या.... घरी आल्या.... आता अंधार गडद होऊ लागला... आल्या आल्या दोघीही सायंकाळच्या स्वयंपाकाला लागल्या....



मोहित आज जरा उशिराच घरी आला....तर... तिथे...वॉचमन काकाच्या खोलीमध्ये....सावित्री काकू आणि वॉचमन काका यांचे बोलण्याचे जोरजोराने आवाज येत होते... आणि.... मायरा समजावण्याचा प्रयत्न करत होती दोघांना....

मोहित तिथे आला तसे मायराचे लक्ष त्याच्याकडे गेले...

त्याने इशारा करून मायराला जवळ बोलावले...आणि विचारले....

"काय करत आहेस तू त्यांच्या घरी...???"



"अरे ....वॉचमन काका आणि सावित्री काकूंचे भांडण  चालू आहे."


"मग त्यांच्या भांडणांमध्ये तू का गेली..??ते त्यांचं बघतील... तू काय करते आहेस तिथे...??"


"ते त्यांचं बघतील म्हणजे..."



"अगं ....त्यांना त्यांचं सार्ट आऊट करू दे ना... तू त्यांच्या मध्ये लुडबुड कशाला करतेस....??"



"अरे ...मोहित ....मी लुडबुड कुठे करत आहे ??मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे..."



"कुणाला समजवत आहेस तू...."




"मी वॉचमन काकांना समजावत आहे..."



"का..?? फक्त काकांनाच का समजवत आहेस...??"काकूंना का समजवत नाहीये...??"



"कारण काका चुकीचे आहे म्हणून....""तुला कसं माहित काका चूक आहेत..... ??आणि काकू बरोबर आहे...."



"माहिती आहे....मला सर्व माहित आहे... मोहित.....आता तू लुडबुड करू नकोस...."



"बरं ..बरं... असू दे ....ते त्यांचं निपटवतील...तू मला एक कप चहा करून दे ना... प्लीज...."

त्याने असे लाडाने..... प्लीज ....म्हणून विनवणी केल्यानंतर तिला नाही म्हणवले जात नव्हते....पण...

"तू कर ना आजच्या दिवस..मला त्यांचा गैरसमज दूर करायचा आहे ...भांडण होतील रे दोघांचे आणखी....."


"मायू..... मी थकलो आहे ना ....मला दे ना गं ....एक कप चहा..."

ती ऐकत नव्हती म्हणून तो इमोशनल ब्लॅकमेल करू लागला...आता हा इमोशनल ब्लॅकमेल करणं मात्र सक्सेसफुल ठरलं.

"बरं... तू फ्रेश हो... मी तुझ्यासाठी चहा ठेवते..आणि हो वॉचमन काकासाठी सुद्धा चहा ठेवते.फ्रेश व्हायला जाताना ...??त्यांना तेवढा आवाज दे....तेवढ्यापुरता तरी वाद थांबेल..."

असे सांगून मायरा चहा मांडते आणि मोहित फ्रेश होण्यासाठी वॉशरूम कडे जातो...

फ्रेश झाल्यावर तो वॉचमनकाकांना चहा पिण्यासाठी आवाज देतो...

आता चहा पीत असताना मायराने वॉचमन काकांच्या बाबत मोहितला छान समजावून सांगितले....

कसे तिखट मॅडमनी सावित्रीकाकूंचे सिलेक्शन केले....?? मोहितही खुश झाला की सावित्रीकाकूंना काहीतरी छान काम मिळाले आहे आणि ते तसे त्याने वॉचमन काकांनासुद्धा सांगितले.

"वाहवा..... छान झाल....सावित्रीकाकूंना विशेष काही करायचे नाही....दुसऱ्यांना शिकवायचे आहे...भांडण...."

त्यावर वॉचमनकाका म्हणाले...

."अरे.... पण तिला भांडण करण्याची सवय लागणार....मग...?? आता आता भांडण करण्याची तिची सवय सुटली.... पून्हा लागली तर...."


मोहित त्यावर म्हणाला....

"काका असं काही नसतं.....त्यामुळे त्यांना काही भांडण करण्याची  सवय वगैरे लागणार नाही आहे... जे तुम्हाला वाटत आहे...... त्या नाहीतरी काम करायला जातातंच बाहेर..... त्याचबरोबर हेही काम करतील छान रीतीने ..... विशेष म्हणजे त्यांना किती छान काम मिळालं आहे...चार पैसे पण जास्त येतील घरात...."

मोहितच्या समंजस बोलल्यामुळे वॉचमनकाकांवर पॉझिटिव्ह इफेक्ट पडला आणि ते तयार झाले...

त्यांची संमती मिळताच सावित्रीबाई यांना एक वेगळाच आनंद झाला....

आपणही निव्वळ स्वयंपाक करण्याच्या कामाचे नाही तर आणखी काही वेगळे करू शकतो या भावनेने त्यांना खूप छान वाटत होते...........






.

.

.

.

.

.


इकडे सुंदर नानाजी शेलार तुरुंगात पिचू लागला होता...



गावातले शेलार यांचे घर सुंदरविना नानाजी आणि रमाबाई यांना ओसाड वाटत होते...

वाडा त्यांचा.... त्यांना उजाड झाला असे वाटत होते दिवसेंदिवस...

रमाबाईने मुलाच्या शिक्षेचा फारच धसका घेतला आणि त्या दुसऱ्याच महिन्यात ते घर आणि जग सोडून गेल्या. 



आता शेलार यांच्या घरात फक्त नानाजी राहिले....

तेही संसारातून आता विरक्त झाल्यासारखे राहू लागले आणि त्यातच गावामध्ये एकदा सत्संग सुरू होते ...तिथे जाऊन बसले तर... त्या कार्यात त्यांना ओढ वाटू लागली.... तेथेच महाराजांसोबत असलेल्या भक्तांसोबतराहून ते आता दिवस घालवू लागले... आणि मग घराला कुलूप बसले.....,......





तुरुंगाच्या भक्कम भिंतीआड...सुंदर ....

त्याला तेथील निकृष्ट अन्न असले तरी खाण्याशिवाय पर्याय नव्हता.... त्याची प्रकृती आता खालावली होती..

.तुरुंगातील शिपाई... त्याचबरोबर तेथील अन्य कर्मचारीयांचे त्याच्याशी... माणुसकीहिन वर्तन... त्याला सहन होत नव्हते...



आजपर्यंत कुणाचेही न ऐकणारा ...स्वतःची सत्ता गाजवणारा तो.... त्याचे मन खचत चालले होते दिवसेंदिवस...

सुरुवातीला एक दोनदा नानाजी भेटायला आले होते... नंतर नंतर त्यांचे भेटणे त्यांनी कमी केले... आणि आता तर येतंच नव्हते भेटायला...

आई ही आता राहिली नव्हती... मामा कधी मधी यायचा.... आता त्याला तिथे राहून सहा महिने होत आले होते... मनात असणारी संपूर्ण उमेद आता संपली होती...

या खडतर आयुष्याची पूर्वी त्याने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.... तो त्यांच्या मित्रांच्या गटातला... कार्यकर्त्यांच्याही ग्रुप मधला ...तुरुंगामध्ये येण्यापूर्वी... एक कंठमणी होता.

पण ....आता तेथे त्याला भेटायला कोणीही कार्यकर्ता किंवा कोणताही मित्र येत नव्हता...

तो एक हिनदीन जीवन जगत होता...

रोज सकाळी संध्याकाळी एक थाळी आणि जग सारखा असणारा डब्बा घेऊन जेवण मिळविण्यासाठी रांगेत जाऊन उभे राहायचे...

अगदी सुरुवातीला त्या धडपड करणाऱ्या कैद्यांची त्याला फार कीव यायची..... त्या कैद्यांना तशी वागणूक देणारे ते कर्मचारी त्यांचा फार फार राग यायचा...

जरा कुठे क्षुल्लक चूक घडली... सकाळी जी आमटी किंवा तिच्या सारखेच लिक्वीड सद्रृश काहितरी मिळायचे ते घेताना तो जगसारखा डब्बा जराही वाकडा धरला तरी कैद्यांच्या घरच्यांचा उद्धार केला जात होता...

खुद्द सुंदरवर सुद्धा एक वेळा तसा प्रसंग आला....हा प्रसंग सुंदरचा त्या कैदखान्यातील त्याच्या प्रारंभीच्या काळातीलच होता....

त्यादिवशी सकाळी...... त्याच्या डब्यासारख्या दिसणाऱ्या त्या जग मध्ये आमटीसारखा दिसणारा खाण्याचा पदार्थ देण्यात आला..तो फक्त... तिखट पाण्यासारखा दिसतोय...कुठूनही आमटी वाटत नाही असे तो सहज म्हणाला...

आणि तेथे त्यावेळी असणाऱ्या व्यवस्थेतील शिपायाने ऐकले आणि लगेच.....

त्याने आपल्या हातातील दंडा सुंदरच्या अवघड भागावर टोचला....

तसे सुंदरच्या अंगाचा भडका उडाला...रागाने थरथर करत तो बसून होता ....तिथून उठला आणि उष्ट्या हातानेच .....त्याने त्या शिपायाला खाली पाडून त्याला मारायला सुरुवात केली....

त्यावेळी आपण कोण आहोत ...??कुठे आहोत ....??

आणि या सर्वांचे भान त्याला अजिबात राहिले नाही...

आणि याचा परिणाम व्हायचा तो झाला...

तो कोण आहे.... ??.....कुठे आहे ....??....याची झोपेतही जाणीव व्हावी ....एवढा त्याला चोप देण्यात आला....

तेथील शिपाई त्याला निर्घृणपणे झोडपंत होते आणि तेथील कैदी तटस्थपणे ते दृश्य पहात होते.


जेव्हा सुंदर सैनिकाला मारत होता त्यावेळी.... त्याने धाडस दाखविले..... त्या सैनिकाला मारायचे म्हणून  इतर कैदी त्याचे धाडस पाहून मनोमन खुश झाले होते...

पण आता त्याची झालेली अवस्था बघून ...तेच कैदी सुंदरला मिळालेल्या माराबद्दल ... त्यांना मनातून हळहळ  वाटत होती पण ते बोलू शकतही नव्हते...


मार खाल्लेल्या रात्री ना त्याला तेथे जेवण मिळाले होते..

ना त्याची तब्येत पाहायला डॉक्टर आले होते...कारण तुरुंगामध्ये कैद्यांसाठी असलेले नियम जे होते ...त्याचा त्याने भंग केला होता...


तेथील जेलरने तिथल्या रजिस्टरमध्ये त्याच्या नावापुढे दूरवर्तन केल्याचा लाल शेरा करून नोंद करून ठेवली होती..


तो प्रसंग झाला आणि तेव्हापासून सुंदरचे  हाल वाढू लागले.


रात्री कोठडीत प्रहर प्रहर त्याला झोप लागत नव्हती.. दर तासाला पडणारा घड्याळाचा टोल ऐकून तो तळमळत उठून बसायचा.आणि एकेक रात्र त्याला युगायुगासारखी वाटायची..


कधी कधी तर त्याचे एवढे हाल  त्यालाही सहन व्हायचे नाही आणि वैतागून तो आपल्या साथीदाराला म्हणायचा..

." जन्मठेप भेटली आहे पण असं वाटतं ....फाशी भेटली असती तर बरं झालं असतं... हे रोजचं मरण तरी टळलं असतं.."




जन्मठेप म्हणजे 14 वर्षाचे आयुष्य तुरुंगात जाणार असे त्याला माहिती होते ..

.तरीही त्याला असा भास होत होता की आपण येथे आता जीवनभर राहणार पण.... जेव्हा तेच 14 वर्षं  नानाजी यांच्याकडून समजले होते ...तेव्हा त्याला थोडेसे बरे वाटले........


.

.

.

.

.

.

.

.

.

.

.


एवढी निवडणूक  जिंकूनही आता बाबाराव आणि लीलादोघांनाही आनंद वाटतंच नव्हता ...

चैतन्याचे वारे मायराबरोबर गेले...

उल्हासही नाही... आशेची ऊब ... घ्यावी तर लीला यांना बाबाराव यांच्या वागणुकीतून तेही दिसून येत नव्हते...



त्यांनी निदान मायरासोबत फोनवर बोलण्याची सुद्धा परमिशन दिली असती तरी चालले असते लीला यांना...

आज काल लीला यांना मायराची फार फार आठवण येत होती.


आठवण येऊ नये म्हणून त्या स्वतःला कामात ओढून घेण्याचा प्रयत्न करत होत्या.. वाड्यात काही काम करण्याची गरज नव्हती.. तरीही त्या स्वतः सगळं समोर उभ्या राहून नोकरांकडून करून घ्यायच्या आणि स्वतःही हातभार लावायच्या....




बंगल्यांच्या चार भिंतीत राहण्यापेक्षा उघड्या निसर्गात वावरल्यामुळे कदाचित आपले मन जागेवर राहील या हेतूने त्या रानात जाऊन भांगलणीपासून गोफण फिरविण्यापर्यंत सर्व कामे पहायच्या...




सर्व परिस्थिती राम सुद्धा पाहत होता... त्याला हळहळ वाटायची लीला यांच्याकडे पाहून....



एकप्रकारे तो त्यांचा मानसपुत्रंच होता पण आज त्याची ही माता त्याच्याशी जवळपास तीन महिने झाले बोलत नाही हे बघून त्याला कासाविस व्हायचे...


पण आता मात्र..... त्याने....

🌹🌹🌹🌹🌹