मुखवटे - 1

  • 726
  • 204

मुखवटे (गूढ दिर्घ कथा-  बाळकृष्ण सखाराम राणे)मुखवटे भाग १मी होळीसाठी तळकोकणात, गोवा सीमेवरच्या त्या सुंदर खेडेगावात सायंकाळी पोहोचलो होतो. मी अगोदरच देवस्थानच्या अध्यक्षांशी संपर्क साधला होता.मला तिथल्या होळी व गडे उत्सवावर एक माहितीपट बनवायचा होता.त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था एका परब नावाच्या मानकर्यांकडे केली होती. पहिल्या दिवशी होळी उभी करण्याचा क्षण मी चित्रीत केला.साठ फुटा पेक्षा उंच सरळ सोट व जाड अश्याआंब्याच्या झाडाची होळी ज्या कुशलतेने उभी केली ते बघण्यासारखे होत.होळीभोवती गवत ( कराड) पेटवून रोंबाट घातलं गेलं.तरूणांचा उत्साह जबरदस्त होता.नमण झालं.मानकर्यांने गार्हण घातलं. लोकांची आंगवणी व गार्हाणी झाली.कोकणातलं गार्हाण हा प्रकार आगळा वेगळा होय. बा, म्हराजा पासून सुरुवात होते.मग