किनारा

"ह्याचं असं भरतं बघून मग मला ही भरतं येतं.. असं वाटतं ना कि तो बाहू पसरून आपल्याकडे धावत येतोय.. मग मी नुसतीच माडासारखी उभी नाही राहू शकत.. सुटते धावत... हा.! आता शरीराने कमी खरंच...पण मनाने जास्त ओढली जाते." हे सांगताना तिच्या डोळ्यात अथांग रत्नाकर पसरला होता."तुझं हे वेड मला नवीन नाही.. हज्जारदा यावर आपलं बोलणं झालंय. पण मी विचारायचा राहत नाही अन तू सांगायची." तो तिची समुद्राकडे लावलेली नजर निरखीत म्हणाला." तसं तर माझं कोणतंच वेड तुझ्यापासून लपलेलं नाही. जे होतं ते तुला सांगून अक्षरशः मोकळी झालीये मी. खूप हलकं हलकं वाटतं मला. जे स्वतःशी बोलले असेल त्याच्याच जवळपास मी