तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला स्थायिक कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला. सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली. भाग ८ भाग ७ वरून पुढे वाचा.... “कोण हवंय आपल्याला?” एका मध्यम वयाच्या बाईने दरवाजा उघडल्यावर विचारलं. “मी निशांत, मी नागपूर वरून आलो आहे, आणि मला वसंतराव परांजपे साहेबांना भेटायचं आहे. आहेत न ते.” “हो आहेत, पण काय काम आहे