तोतया वारसदार पात्र परिचय- सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला. सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली. भाग ९ भाग ८ वरून पुढे वाचा.... “दुसरी मुलगी सरिता,” वसंतराव सांगत होते, “ तिचंही लग्न विनायकरावांनी मोठ्या थाटात लावून दिलं. सगळं छान चाललं होतं, पण बिचारीच्या नशिबी संसारसुख नव्हतं. वर्षभरातच तिचा नवरा साप चावल्यामुळे