तोतया वारसदार भाग १० भाग ९ वरून पुढे वाचा.... “मी असं करतो, की उद्या, एकदा नागपूरच्याच आर्मी वेलफेअर ऑफिस मधे जाऊन, काही माहिती मिळते का बघतो, अविनाशच्या बरोबर कोण होते त्यांचा काही ठाव ठिकाणा लागला तर बघतो. त्यांचे पत्ते मिळाले तर त्यांच्याकडे विचारपूस करता येईल. नाही काही मिळालं तर दिल्लीला जायचं.” निशांतनी आपले प्लॅन्स सांगितले. “ओके. बरोबर आहे. पण दिल्लीला जायची जरूर पडली तर आम्हाला सांगून जा. आणि तिथे काय माहिती मिळते ते कळवत जा.” – सारंग “सर्व अपडेट वेळोवेळी तुम्हाला देत राहीन. या बाबतीत तुम्ही निश्चिंत रहा.” – निशांत. दुसऱ्या दिवशी निशांत, आर्मी वेलफेअर ऑफिस मधे गेला.