शोध: साहित्यिकांच्या पाऊलखुणांचा २पहिले पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व साहित्यिक रविंद्र पिंगे यांच्या घरांना भेटी आज ३/०४/२०२६ वार- शुक्रवार आम्ही (१९८२ ची एस.पी.के.ची सायन्स शाखेची बॅच) साहित्यिकांच्या मूळ घरांना भेट देण्यासाठी बाहेर पडलो.मागच्या वेळी आम्ही वि.स.खांडेकर,जयवंत दळवी,मंगेश पाडगावकर व आरती प्रभू यांच्या कार्यक्षेत्रला किंवा जन्मस्थळाला भेट दिली होती.त्या प्रवास वर्णनाला वाचकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.पण तो प्रवास सावंतवाडी पासून साधारण चाळीस एक किलोमीटरच्या परीघात होता.पण यावेळी अंतर होतं जवळपास १४० किलोमीटरच्या आसपास होत. मराठीतील पहिले वृत्तपत्र ' दर्पण 'काढणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर व आयुष्य म्हणजे आनंदाच झाड आहे ह्या वृत्तीने अफाट लेखन करणारे रविंद्र पिंगे यांच्या गावाला व घराला भेट देऊन अभिवादन करण्याच