तोतया वारसदार - भाग 11

(108)
  • 2.5k
  • 1.5k

  तोतया वारसदार भाग  ११    भाग १०   वरून पुढे  वाचा....   “साहेब, अशी जर परिस्थिती आहे, तर त्यांच्या यूनिट मधे जे लोकं असतील, त्यांचे पत्ते मिळू शकतील का? दुसरं काही नाही, आमच्या मनाचं समाधान हौईल.” निशांतनी विनंती केली. “हे बघा, अविनाश नागपूरचे होते, म्हणून या ऑफिस मधे त्यांची माहिती तुम्हाला मिळू शकली. त्यांचे सहकारी कुठल्या गावाचे असतील हे कसं सांगणार? आमच्या कडे ती माहिती नसते. तुम्हाला हवंच असेल तर दिल्लीच्या आर्मी हेड क्वार्टर मधे जाऊन चौकशी करावी लागेल.” “ठीक आहे साहेब. खूप खूप धन्यवाद तुमचे. पण ते आम्हाला माहिती देतील का? तुम्ही एखाद पत्र देता का? कारण त्यांनी ऐकलं नाही