तोतया वारसदार भाग १२ भाग ११ वरून पुढे वाचा.... निशांत त्याच रात्री विमानाने नागपूरला आला. दूसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सारंग सरांना फोन केला. सारंग सरांना जरा आश्चर्यच वाटलं. “अरे निशांत? परवाच दिल्लीला गेला होतास न? काम झालं? एवढ्या सकाळी कसा काय फोन केलास?” – सारंग. मग निशांतने दिल्लीला काय झालं ते सांगीतलं. सगळं शांत पणे ऐकून घेतल्यावर सारंग सर म्हणाले “ओके. आज दिवसभरात मी सगळी कागद पत्र तयार करून घेतो. तू संध्याकाळी ७ वाजता ये ऑफिसला.” संध्याकाळी निशांत सारंगच्या ऑफिस मधे पोचला. सारंगने सर्व कागद तयार ठेवले होते. “हूं, बोल आता नेमकं काय झालं ते.” मग निशांतने सर्व कहाणी