निवेदक: श्रीयुत मुंबईची ही भर दुपार. सूर्य माथ्यावर तळपतोय. प्रकाशाच्या धारा अंगावर कोसळतायत जसा की पाऊसच. हा अंगावरचा शर्ट? भिजलाय घामानं. भिजून अंगाला चिटकलाय. आणि मी? मी या उकाड्यात जिद्दीने उठबशा काढतोय. रोजसारख्या.व्यायाम करता करता माझे हात अचानक थांबले. नजर खिळली ती समोर. घराच्या एका काचेच्या चौकटीवर. सहा महिने झाले होते मला इथे येऊन. पण त्या खिडकीपलीकडे, त्या चौकटीतल्या 'फ्रेम'मध्ये कोण राहतय हे डोकावून पाहण्याची तसदी मी घेतली नव्हती.पण आज ती खिडकी नेहमीसारखी रिकामी नव्हती. का? कोण होतं तिथे?मीरा. होय, खिडकीच्या त्या चौकटीत आज मीरा उभी होती. अंगात पिवळा सुती मऊ ड्रेस घालून. त्या ड्रेसच्या कडा तिच्या गोलाकार शरीरावर ताणल्या होत्या. दुपारचं ते