तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. जय - व्यंकटेशचा मुलगा. रोहन - सौमित्रचा मुलगा. भाग १७ भाग १६ वरून पुढे वाचा.... “एकदम बरोबर साहेब, मग मी उद्या याच वेळेस फोन करू का? मी सगळे डिटेल्स तयार ठेवतो.” – सारंग. “ओके, मी उद्या तुमच्या फोनची वाट पाहतो. गुड नाइट.” – व्यंकटेश. “गुड नाइट.” – सारंग. “मग आता?” – प्रशांत. “आता काही नाही, उद्या रात्री पुन्हा सर्व जमा. व्यंकटेशला फोन लावू. बघूया काय म्हणतात ते.” – सारंग. “सारंग, मला असं वाटतं की तू त्या दोघांना इथे बोलावून घ्यावस. हवं तर आपण त्यांच्या तिकीटांची