तोतया वारसदार पात्र रचना व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं. जय - व्यंकटेशचा मुलगा रोहन - सौमित्रचा मुलगा भाग १८ भाग १७ वरून पुढे वाचा.... “हॅलो, मी सारंग वकील बोलतो आहे, नागपूर वरून, सौमित्र साहेब आहेत का? त्यांच्याशी बोलायचं आहे.” -सारंग “मी रोहन बोलतो आहे, रोहन सौमित्र गोखले. बोला सारंग साहेब, आम्ही ऐकतो आहोत.” “आत्ता थोड्या वेळापूर्वी आम्ही व्यंकटेश साहेबांना फोन केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांना बाबांच्या संपत्तीत हिस्सा नको आहे. पण तुम्ही लोकं तिथे नव्हते, म्हणून तुमचं मत जाणून घेण्यासाठी हा फोन केला.” सारंग म्हणाला. “आमचंही तेच मत आहे, पण आज आम्हाला